शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Samsung Galaxy Z Fold3 आणि Galaxy Z Flip 3 5G फोन भारतात सादर; जाणून घ्या या जबरदस्त स्मार्टफोन्सच्या किंमती 

By सिद्धेश जाधव | Updated: August 16, 2021 17:56 IST

Galaxy Z Series India Price: कंपनीने Samsung Galaxy Z Fold3 5G आणि Galaxy Z Flip 3 5G असे दोन फोन भारतासह जगभरात लाँच केले होते.

ठळक मुद्देहे दोन्ही स्मार्टफोन्स येत्या 24 ऑगस्टपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील आणि 10 सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील.  Samsung Galaxy Z Flip 3 5G देखील दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

Samsung ने गेल्या आठवड्यात Galaxy Unpacked नावाच्या इव्हेंटच्या माध्यमातून आपले दोन फोल्डेबल फोन सादर केले होते. कंपनीने Samsung Galaxy Z Fold3 5G आणि Galaxy Z Flip 3 5G असे दोन फोन भारतासह जगभरात लाँच केले होते. लाँचच्या वेळी कंपनीने या स्मार्टफोन्सच्या युरोपियन किंमतीची घोषणा केली होती, परंतु भारतीय किंमतीचा उल्लेख केला नव्हता. आज सॅमसंग इंडियाने हे दोन्ही अनोख्या स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन्स येत्या 24 ऑगस्टपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील आणि 10 सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

Samsung Galaxy Z Fold3 5G ची किंमत आणि ऑफर्स  

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड 3 5जी फोनचे दोन व्हेरिएंट्स भारतात लाँच केला गेला आहे. फोनचा छोटा 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट 1,49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर या फोनचा 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 1,57,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड3 5जी फोन को भारतीय बाजारात Phantom Black आणि Phantom Green कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनच्या प्री-बुकिंगवर कंपनी 7,999 रुपयांचा सॅमसंग केयर+ अ‍ॅक्सिडेंटल अँड लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन देण्यात येईल.  

Samsung Galaxy Z Fold3 5G च्या माहितीसाठी इथे क्लिक करा 

Samsung Galaxy Z Flip 3 5G ची किंमत आणि ऑफर्स 

Samsung Galaxy Z Flip 3 5G देखील दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मॉडेल 84,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 88,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा सॅमसंग फोल्डेबल फोन Phantom Black आणि Cream कलरमध्ये भारतात उपलब्ध झाला आहे. तसेच Samsung Galaxy Z Flip3 5G फोनच्या प्री-बुकिंगवर 4,799 रुपयांचे प्रोटेक्शन देण्यात येत आहे.  

Samsung Galaxy Z Flip 3 5G च्या माहितीसाठी इथे क्लिक करा 

हे दोन्ही स्मार्टफोन्स येत्या 24 ऑगस्टपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील आणि 10 सप्टेंबरपासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. खरेदी करताना एचडीएफसी कार्डचा वापर केल्यास 7,000 रुपयांचा कॅशबॅक देखील दिला जात आहे. तसेच ग्राहकांना Galaxy SmartTag देखील मोफत देण्यात येईल.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोन