11 ऑगस्टला Samsung ने एका इव्हेंटचे आयोजन केले आहे. या इव्हेंटमधून कंपनी बहुप्रतीक्षित नवीन ‘फोल्ड’ आणि ‘फ्लिप’ फोन सादर करणार आहे. कंपनी यादिवशी Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Galaxy Z Flip 3 हे दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे, याची माहिती कंपनीने आधीच दिली आहे. 11 ऑगस्टला ग्लोबल लाँच सोबतच हे दोन्ही डिवायस भारतात देखील सादर केले जातील आणि आजपासून हे सॅमसंग डिवाइस भारतात Pre-reserve करता येतील.
सॅमसंग इंडियाने Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Galaxy Z Flip 3 च्या Pre-reservation ची सुरुवात केली आहे. हे दोन्ही फोल्डेबल डिवाइस प्री-रिजर्व करण्यासाठी 2,000 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. त्यानंतर ग्राहकांना ‘Next Galaxy VIP Pass’ मिळेल. फोन रिजर्व केल्यावर 2,699 रुपयांचा Galaxy Smart Tag कंपनी मोफत देत आहे. तसेच फोन उपलब्ध झाल्यावर फोनच्या किंमतीततून हे 2,000 रुपये कमी केले जातील.
Samsung Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 ची किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, Galaxy Z Fold 3 ची किंमत 1,35,000 रुपये तर MRP 1,49,990 रुपये असेल. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये Fold 2 गेल्यावर्षी 1,49,990 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. Galaxy Z Flip 3 ची रिटेल प्राईज 80,000 ते 90,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते. Flip 3 भारतात लाँच होणारा सर्वात किफायतशीर फोल्डेबल स्मार्टफोन असेल.
Samsung Galaxy Z Fold 3 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगच्या फोल्डेबल स्मार्टफोन 7.55-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले आणि 6.2- इंचाच्या कवर डिस्प्लेला सपोर्ट करेल. अँड्रॉइड ओएससह या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 888 चिपसेट मिळू शकतो. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 12MP चा मुख्य सेन्सर, 12MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 12MP चा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. या फोल्डेबल डिस्प्लेमध्ये 16MP चा अंडर स्क्रीन कॅमेरा सेन्सर असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
Samsung Galaxy Z Flip3 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy Z Flip3 मध्ये 6.7 इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले देण्यात येईल. त्याचबरोबर फोनमध्ये 1.9-इंचाचा डिस्प्ले कव्हरवर दिला जाईल. या फोल्डेबलमध्ये आतल्या बाजूस 10MP चा सेल्फी कॅमेरा आणि बॅक पॅनलवर 12MP-12MP चे दोन कॅमेरे असतील. Galaxy Z Flip3 स्मार्टफोन 3,300mAh च्या बॅटरीला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये Snapdragon 888 चिपसेट असेल, सोबत 8GB रॅम आणि 128GB किंवा 256GB स्टोरेज दिली जाऊ शकते.