शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

अरे वा! फोल्डेबल स्मार्टफोनचा अनुभव परवडणाऱ्या किंमतीत; Samsung Galaxy Z Flip 3 Lite होऊ शकतो 11 ऑगस्टला लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: July 6, 2021 15:35 IST

Samsung Galaxy Z Flip 3 Lite expected: Samsung 11 ऑगस्टला Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, आणि Galaxy Z Flip 3 Lite हे तीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करू शकते, अशी माहिती Korea Herald ने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे.

Samsung च्या वार्षिक Galaxy Unpacked इव्हेंटचे आयोजन यावर्षी 11 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. याची माहिती कालच कंपनीने दिली आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, Galaxy Watch 4 आणि Galaxy Buds हे प्रॉडक्ट लाँच करू शकते. गेल्या काही महिन्यांपासून या सर्व प्रॉडक्ट्सची माहिती लिक्स आणि अफवांमधून समोर आली आहे. परंतु आता प्रथमच एका नवीन डिवाइसची माहिती समोर आली आहे. लीक रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग Galaxy Flip 3 सोबत 11 ऑगस्ट रोजी Galaxy Z Flip 3 Lite देखील लाँच करू शकते.  (Samsung Galaxy Z Flip 3 Lite 11 August launch rumors)

Samsung 11 ऑगस्टला Galaxy Z Fold 3, Galaxy Z Flip 3, आणि Galaxy Z Flip 3 Lite हे तीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करू शकते, अशी माहिती Korea Herald ने आपल्या रिपोर्टमध्ये दिली आहे. Galaxy Z Flip 3 Lite स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत सादर केला जाईल, असा दावा देखील या पब्लिकेशनने केला आहे. यापूर्वीही सॅमसंगच्या चार फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे ही बातमी खरी असू शकते. परंतु सॅमसंगने अजूनतरी याबात कोणतीही अधिकृत माहित दिली नाही. त्यामुळे ठोस माहितीसाठी 11 ऑगस्टची वाट बघावी लागेल.  

Samsung Galaxy Z Flip 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ फोल्डेबल अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. फोनच्या मागे असलेले एक्सटर्नल डिस्प्ले आधीच्या तुलनेत मोठा असेल. यावेळी हा डिस्प्ले 1.9-इंचाचा असेल. या स्मार्टफोनच्या रेंडरमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिसत आहे. परंतु कॅमेरा स्पेक्सची माहिती समोर आली नाही.    

जुन्या Galaxy Z Flip 2 प्रमाणे यात पावर बटण, वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येतील. Galaxy Z Flip 3 मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC, 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल, अशी चर्चा आहे. Samsung Galaxy Z Flip 3 ची किंमत 1,400 डॉलर (अंदाजे 1,04,100 रुपये) असू शकते.   

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड