शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या Samsung Galaxy Z Flip 3 ची वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: August 12, 2021 12:13 IST

Galaxy Z Flip 3 Launch: Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन वॉटर प्रूफ आहे तसेच यात अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सुधारण्यात आले आहेत. असे जरी असले तरी हा सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन आहे.  

ठळक मुद्देGalaxy Z Flip 3 स्मार्टफोन वॉटर प्रूफ आहे तसेच यात अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सुधारण्यात आले आहेत. Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहेत.

Samsung ने आपल्या Galaxy Unpacked 2021 इव्हेंटच्या माध्यमातून आपले थर्ड जेनरेशन फोल्डेबल स्मार्टफोन्स सादर केले आहेत. Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 असे दोन स्मार्टफोन कंपनीने या इव्हेंटमधून लाँच केले आहेत. त्याचबरोबर कंपनीने Galaxy Buds 2 आणि Galaxy Watch 4 सीरीज देखील बाजारात आणली आहे. यावर्षी सादर करण्यात आलेला Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन वॉटर प्रूफ आहे तसेच यात अनेक फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स सुधारण्यात आले आहेत. असे जरी असले तरी हा सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन आहे.  

Samsung Galaxy Z Flip 3 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनमध्ये कंपनीने दोन स्क्रीन दिल्या आहेत. यात एक मुख्य स्क्रीन आहे आणि बॅक पॅनलवर एक छोटी सेकंडरी स्क्रीन देण्यात आली आहे. मुख्य डिस्प्लेचा आकार 6.7 इंच आहे, हा एक फुल एचडी+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हा पंच होल असलेला डिस्प्ले 120HZ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनच्या मागे नोटिफिकेशन, टाइम आणि मेसेज दाखवण्यासाठी 1.9 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो रियर कॅमेऱ्यासाठी व्यू फायन्डरचे देखील काम करतो.  

Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित OneUI 3 वर चालतो. सॅमसंगने या Flip फोनसाठी आपल्या यूआयमध्ये खास बदल केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय 6E, ब्लूटूथ 5.0, एनएफसी, 5G, जीपीएस आणि यूएसबी टाइप-C पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत.  

Samsung Galaxy Z Flip 3 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एक 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. मुख्य डिस्प्लेवरील पंच होलमध्ये 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनमध्ये 3300mAh ची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Samsung Galaxy Z Flip 3 ची किंमत 

Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. या फोनचा छोटा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि मोठा व्हेरिएंट 8GB रॅमसह 256GB स्टोरेजसह लाँच झाला आहे. या फोनची भारतीय किंमत कंपनीने सांगितली नाही. परंतु हा स्मार्टफोन जागतिक बाजारात 999 डॉलर (सुमारे 74,199 रुपये) मध्ये विकत घेता येईल. 27 ऑगस्टपासून या फोनच्याविक्रीला सुरुवात होईल. भारतात सॅमसंगच्या दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोनची प्री बुकिंग सुरु आहे आणि प्री बुकिंगवर गिफ्ट देखील देण्यात येत आहेत.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड