शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अ‍ॅक्टीव्ह : काय आहेत फिचर्स ?

By शेखर पाटील | Updated: August 11, 2017 13:27 IST

सॅमसंग कंपनीने आपले सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अ‍ॅक्टीव्ह हे फ्लॅगशीप मॉडेल बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून ते रफ वापरासाठी उपयुक्त असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये सॅमसंग कंपनी आपले बहुप्रतिक्षित गॅलेक्सी नोट ८ हे उच्च श्रेणीतील मॉडेल ग्राहकांना सादर करणार असून याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली आहे. या आधीच सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अ‍ॅक्टीव्ह हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहे. पहिल्यांदा अमेरिकन ग्राहकांना ते उपलब्ध करण्यात आले असून लवकरच भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये ते सादर करण्यात येईल असे मानले जात आहे. सॅमसंगच्या अ‍ॅक्टीव्ह या मालिकेतील स्मार्टफोन हे खास करून रफ वापरासाठी आवश्यक असणार्‍या विविध फिचर्सनी सज्ज आहेत. अर्थात सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अ‍ॅक्टीव्ह हे मॉडेलदेखील याला अपवाद नाही. यात अतिशय मजबूत अशी मेटल फ्रेम प्रदान करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ व शॉकप्रूफ आहे. याचा डिस्प्ले ‘शॅटरप्रूफ’ असून समार्टफोन अगदी पाच फुट उंचीवरून पडूनही याच्या स्क्रीनला साधा तडादेखील जात नसल्याचा सॅमसंग कंपनीचा दावा आहे. या मॉडेलला लष्करी उपकरणांप्रमाणे मजबूती प्रदान करण्यात आली असून याच्या जोडीला उत्तम दर्जाचे वेष्टणदेखील असेल. अगदी विषम वातावरणातही याला सुलभपणे वापरता येत असल्याचे सॅमसंग कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे. 

उर्वरित फिचर्सचा विचार केला तर, या स्मार्टफोनमध्ये बॅटरीचा अपवाद वगळता सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या मॉडेलमधील बहुतांश फिचर्स असतील. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून याच्या मदतीने ३२ तासांचा टॉकटाईम तर पाच दिवसांचा स्टँडबाय टाईम मिळत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये इन्फीनिटी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात कडांचा वापर न करता मोठ्या डिस्प्लेचा वापर करता येणार आहे. या मॉडेलमध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी म्हणजेच २५६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ अ‍ॅक्टीव्ह या मॉडेलमध्ये मुख्य व फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १२ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. यातल्या फ्रंट कॅमेर्‍यामध्ये स्मार्ट ऑटो-फोकस हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाचे सेल्फी घेता येईल असा कंपनीने दावा केला आहे. तर याच्या मुख्य कॅमेर्‍यात ऑटो-फोकस, ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन, एलईडी फ्लॅश आणि ८ एक्स एवढ्या डिजीटल झूमची व्यवस्था असेल.