शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंतचा सर्वात पावरफुल Samsung स्मार्टफोन झाला लाँच; 108MP कॅमेरा, 1TB स्टोरेजसह मिळणार S-Pen सपोर्ट 

By सिद्धेश जाधव | Updated: February 10, 2022 11:53 IST

Samsung Galaxy S22 Ultra 5G Launch: सॅमसंगनं आपल्या Samsung Galaxy Unpacked 2022 Event मधून Galaxy S22 Series चे डिवाइसेज लाँच केले आहेत. या सीरीजमधील सर्वात पावरफुल Galaxy S22 Ultra मध्ये S-Pen सपोर्ट देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy S22 Ultra काल म्हणजे 9 फेब्रुवारीला झालेल्या Samsung Galaxy Unpacked February 2022 Event मध्ये लाँच झाला आहे. या फोनमध्ये 108MP कॅमेरा, 12GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि बिल्ट-इन S-Pen सपोर्ट देण्यात आला आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे ज्यात गेल्यावर्षीच्या Galaxy S21 Ultra च्या तुलनेत अनेक बदल करण्यात आले आहेत.  

Samsung Galaxy S22 Ultra चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy S22 Ultra मध्ये 6.8 इंचाचा QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्प्लिंग रेटला सपोर्ट करतो. यात अंडर-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 किंवा Exynos 2200 प्रोसेसरसह वेगवेगळ्या देशांमध्ये उपलब्ध होईल. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Android 12 आधारित OneUI 4.1 वर चालतो. 

Galaxy S22 Ultra चा कॅमेरा सेगमेंट खूप खास आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. सेटअपमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 10MP चे दोन टेलीफोटो कॅमेरा मिळतात. सेल्फीसाठी 40MP चा सेन्सर देण्यात आला आहे. गॅलेक्सी एस22 अल्ट्रामध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. जी 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.  

Samsung Galaxy S22 Ultra ची किंमत 

Samsung Galaxy S22 Ultra 5G स्मार्टफोन Graphite, Red आणि Sky Blue कलरमध्ये विकत घेता येईल. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 1199 डॉलर्स (जवळपास 89,737 रुपये) ठेवण्यात आली आहे. भारतीय किंमत आणि लाँच डेट समोर आली नाही.  

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान