शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

एक दोन नव्हे तर 12 5G बँड्ससह Samsung Galaxy M32 5G आला भारतात; देणार का Xiaomi-Realme ला टक्कर 

By सिद्धेश जाधव | Updated: August 25, 2021 15:03 IST

Samsung Galaxy M32 5G Price: Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह ब्लॅक आणि ब्लू रंगात सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देSamsung Galaxy M32 5G स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह ब्लॅक आणि ब्लू रंगात सादर करण्यात आला आहे.

Samsung ने आज गॅलेक्सी ‘एम’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा फोन जूनमध्ये सादर झालेल्या Galaxy M32 स्मार्टफोनचा 5G व्हेरिएंट आहे. भारतात हा फोन Samsung Galaxy M32 5G नावाने सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु अ‍ॅमेझॉन या फोनवर डिस्काउंट देखील देत आहे. (Samsung Galaxy M32 5G launched in India at rs 20,999)   

Samsung Galaxy M32 चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ इनफिनिटी ‘व्ही’ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करणारा TFT डिस्प्ले आहे, जो Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह येतो. हा अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित OneUI 3.1 वर चालतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 720 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह लाँच झाला आहे. या फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते.  

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.   

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बॅंड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, USB Type-C port, आणि 3.5mm जॅक असे ऑप्शन देण्यात आले आहेत. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.  

Samsung Galaxy M32 5G किंमत 

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह ब्लॅक आणि ब्लू रंगात सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 2 सप्टेंबरपासून अ‍ॅमेझॉन आणि सॅमसंगच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. पहिल्या सेल दरम्यान ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 2,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड