शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Samsung Galaxy F62 वर 4,000 रुपयांचा डिस्काउंट; मर्यादित कालावधीसाठी ऑफर

By सिद्धेश जाधव | Updated: July 12, 2021 11:45 IST

Samsung Galaxy F62 Price Cut: Samsung Galaxy F62 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB मेमरी 23,999 रुपयांच्या ऐवजी 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

सॅमसंगने काही महिन्यांपूर्वी आपल्या गॅलेक्सी एफ सीरिजमध्ये Samsung Galaxy F62 स्मार्टफोन लाँच केला होता. आता या स्मार्टफोनच्या किंमतीवर कंपनी 4,000 रुपयांची सूट देत आहे. ही सूट ऑफलाइन स्टोरमधून हा स्मार्टफोन विकत घेतल्यानंतर मिळवता येईल. ही एक पे आउट स्कीम आहे त्यामुळे यात मिळणारे फायदे दुकानदारांवर अवलंबून असतील. सॅमसंगने मात्र या फोनवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट निश्चित केला आहे.  

नवीन किंमत  

Samsung Galaxy F62 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB मेमरी 23,999 रुपयांच्या ऐवजी 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 25,999 रुपयांमध्ये लाँच झालेला 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 4,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 21,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. ही ऑफर 13 जुलैपर्यंत सुरु राहील.  

Samsung Galaxy F62 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy F62 मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये सॅमसंगचाच फ्लॅगशिप चिपसेट Exynos 9825 देण्यात आला आहे. हा सॅमसंग फोन 8GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते. 

Samsung Galaxy F62 स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 12 मेगापिक्सलची वाईड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड