शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

रेडमी-रियलमीची झोप उडणार; Samsung नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, पहिल्याच सेलमध्ये मोठा डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Updated: March 8, 2022 15:28 IST

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  

Samsung नं भारतात आपला स्वस्त 5G स्मार्टफोन Galaxy F सीरिजमध्ये सादर केला आहे. Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. विशेष म्हणजे कंपनीनं यात 5G कनेक्टिविटीसाठी 12 बँड दिले आहेत. चला जाणून घेऊया Galaxy F23 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्सची माहिती.  

Samsung Galaxy F23 5G चे स्पेसिफिकेशन्स 

कमी बजेटमध्ये देखील Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन दमदार स्पेक्ससह बाजारात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित सॅमसंगच्या One UI 4.1 वर चालतो. कंपनीनं यात क्वालकॉमच्या Snapdragon 750G चिपसेटचा वापर केला आहे. सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. सोबत 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. यातील पावर कुल टेक्नॉलॉजी गेमिंग परफॉर्मन्स सुधारते.  

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंगनं 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल बँड वायफाय, Bluetooth 5.0, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. यात अन्य 5G फोन्स प्रमाणे यात एक-दोन बँड्स मिळत नाहीत तर हा फोन 12 बँड्सना सपोर्ट करतो. Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. 

Samsung Galaxy F23 5G ची किंमत 

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 15999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 16 मार्चपासून हा फोन सॅमसंग शॉप आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतगर्त ICIC बँक क्रेडिट कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. 

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइलAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान