शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

6GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह धमाकेदार Samsung Galaxy F22 लाँच; किंमत फक्त 12,499 रुपये 

By सिद्धेश जाधव | Updated: July 6, 2021 13:15 IST

गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर आज Samsung Galaxy F22 भारतात लाँच झाला आहे. सॅमसंगच्या एफ सीरिजमधील या स्मार्टफोनमध्ये 90Hz ...

गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर आज Samsung Galaxy F22 भारतात लाँच झाला आहे. सॅमसंगच्या एफ सीरिजमधील या स्मार्टफोनमध्ये 90Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 6000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड कॅमेरा सेटअप असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. कंपनीने या स्मार्टफोनच्या छोट्या व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये ठेवली आहे.  

Samsung Galaxy F22 चे स्पेसिफिकेशन्स 

सॅमसंग गॅलेक्सी एफ22 मध्ये 6.4-इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. हा सॅमसंग स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 चिपसेट देण्यात आला आहे.

 

Samsung Galaxy F22 फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Samsung Galaxy F22 मध्ये पावर बॅकअपसाठी 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Samsung Galaxy F22 ची किंमत 

सॅमसंग गॅलेक्सी एफ22 भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल 13 जुलै रोजी 12 वाजता Flipkart वर सुरु होईल. फोनच्या 4 जीबी रॅम+ 64 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम+ 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट सॅमसंगने 14,499 रुपयांमध्ये लाँच केला आहे.  Samsung Galaxy F22 चा छोटा व्हेरिएंट 13 जुलैला 11,499 रुपयांच्या इंट्रोडक्टरी किंमतीत विकत घेता येईल. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड