शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह शक्तिशाली Samsung Galaxy A52s 5G भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: September 1, 2021 14:38 IST

Samsung Galaxy A52s 5G Price India: Samsung Galaxy A52s 5G ची प्रारंभिक किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल.

ठळक मुद्देSamsung Galaxy A52s 5G ची प्रारंभिक किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे.सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

गेले कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर आज Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोन भारतात अधिकृतपणे लाँच झाला आहे. गेल्या महिन्यात जागतिक बाजारात उपलब्ध झाल्यानंतर देशातील सॅमसंगचे चाहते गॅलेक्सी ए52एस 5जी फोनची आतुरतेने वाट बघत होते. हा फोन भारतात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्रोसेसर, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 8GB रॅम अश्या दमदार स्पेसिफिकेशन्ससह दाखल झाला आहे.  

Samsung Galaxy A52s 5G ची किंमत 

Samsung Galaxy A52s 5G ची प्रारंभिक किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत या स्मार्टफोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट विकत घेता येईल. तर 8GB RAM सह 128 GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 37,499 रुपये खर्च करावे लागतील. हा फोन आजपासून ऑफलाइन आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून ऑनलाईन विकला जाईल. या फोनसह HDFC बँकेच्या ग्राहकांना डेबिट, क्रेडिट आणि ईएमआय ट्रँजॅक्शनवर 3,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.  

Samsung Galaxy A52s 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट आणि एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वनयुआय 3 वर चालतो.      

सॅमसंगने आपला हा फोन ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे. हा फोन IP67 रेटेड आहे, त्यामुळे हा वॉटर व डस्ट प्रूफ बनतो. ड्युअल मोड 5G आणि इतर बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये Samsung Pay, Samsung Knox आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे.      

सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सॅमसंग फोनमधील 4,500एमएएचची बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy A52s 5G फोनचा आकार 159.9 x 75.1 x 8.4एमएम आणि वजन 189 ग्राम आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड