शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान अखेर जिंकला, पण संथ खेळीमुळे खड्ड्यात राहिला; १४ षटकांत जिंकायचं होतं, पण... 
2
महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी
3
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन दोषी, फेडरल गन प्रकरणात कोर्टाचा मोठा निर्णय
4
शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
5
PM Narendra Modi : सोशल मीडियावरून 'मोदी का परिवार' आता हटवा; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती
6
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
7
स्पर्धेबाहेर होण्याच्या भितीने पाकिस्तानची कामगिरी सुधारली; जॉन्सनच्या तडाख्याने हुडहुडी भरली
8
Fact Check: मोदींविरोधात घोषणा देणारी महिला कंगनाला मारणाऱ्या CISFची आई नाही!
9
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
10
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
11
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
12
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
13
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
14
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
15
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
16
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
17
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
18
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
19
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
20
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Samsung चा सर्वात स्वस्त 5G फोन 23 जुलैला येणार भारतात; जाणून घ्या Galaxy A22 ची किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: July 22, 2021 7:35 PM

Samsung Galaxy A22 5G Launch: सॅमसंग इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवर एक टीजर शेयर करून सांगितले आहे कि गॅलेक्सी A22 5G भारतात 23 जुलैला लाँच केला जाईल. 

Samsung लवकरच भारतातील 5G स्मार्टफोनचा पोर्टफोलिओ वाढवणार आहे. कंपनी भारतात Samsung Galaxy A22 स्मार्टफोनचा 5G मॉडेल करण्याची तयारी करत आहे. कंपनीने Galaxy A22 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली नाही, परंतु आता सॅमसंग इंडियाने आपल्या ट्विटर हँडलवर एक टीजर शेयर करून सांगितले आहे कि गॅलेक्सी A22 5G भारतात 23 जुलैला लाँच केला जाईल.  (Samsung Galaxy A22 5G will launch on 23 july teased)

Samsung Galaxy A22 5G ची भारतीय किंमत  

काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy A22 5G च्या किंमतीची माहिती समोर आली होती. रिपोर्टनुसार, Samsung Galaxy A22 5G चा 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. तर,फोनच्या 8GB रॅम + 128GB मॉडेलची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात येईल. हा फोन गेल्या महिन्यात जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता, त्यामुळे Samsung Galaxy A22 5G च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे.   

Samsung Galaxy A22 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स   

Samsung Galaxy A22 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Dimensity 700 5G SoC सह बाजारात दाखल झाला आहे. या सोबत 8GB पर्यंतचा रॅम 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 11 आधारित वन युआय 3.0 वर चालतो.   

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A22 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.   

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड