शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Samsung चा स्वस्त 5G फोन होणार भारतात लाँच; Galaxy A22 5G देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?   

By सिद्धेश जाधव | Updated: July 13, 2021 19:23 IST

Galaxy A22 5G India launch: गेल्या महिन्यात जागतिक बाजारात सादर झालेला Galaxy A22 5G फोन लवकरच भारतात दाखल होऊ शकतो.

Samsung भारतात आपला नवीन 5G स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. गेल्या महिन्यात जागतिक बाजारात सादर झालेला Galaxy A22 5G फोन लवकरच भारतात दाखल होऊ शकतो. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंटमध्ये आला होता. या स्मार्टफोनसोबत लाँच झालेला Samsung Galaxy A22 4G फोन यापूर्वीच देशात उपलब्ध झाला आहे. आता Samsung Galaxy A22 5G भारत पदार्पण करेल अशी माहिती 91मोबाईल्सने दिली आहे.  

91मोबाईल्सने टिप्सटर योगेशच्या हवाल्याने सांगितले आहे कि, सॅमसंग आपला नवीन 5जी फोन गॅलेक्सी ए22 भारतात ऑगस्टमध्ये लाँच करणार आहे. या फोनच्या लाँचची अचूक तारीख सांगण्यात आली नाही परंतु Samsung Galaxy A22 5G फोन स्वातंत्र्य दिनाच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो.  

Samsung Galaxy A22 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A22 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Dimensity 700 5G SoC सह बाजारात दाखल झाला आहे. या सोबत 8GB पर्यंतचा रॅम 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 11 आधारित वन युआय 3.0 वर चालतो. 

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A22 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 15 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

टॅग्स :samsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड