शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ओप्पो एफ ३ स्मार्टफोनची रोझ गोल्ड आवृत्ती

By शेखर पाटील | Updated: August 8, 2017 13:55 IST

ओप्पो कंपनीने आपल्या ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणार्‍या ओप्पो एफ ३ या स्मार्टफोनचे रोझ गोल्ड रंगाचे व्हेरियंट सादर केले असून याचे मूल्य १९,९९० रूपये इतके असेल.

ओप्पो कंपनीने आपल्या ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणार्‍या ओप्पो एफ ३ या स्मार्टफोनचे रोझ गोल्ड रंगाचे व्हेरियंट सादर केले असून याचे मूल्य १९,९९० रूपये इतके असेल. ओप्पो कंपनीने भारतात मे महिन्यात ओप्पो एफ ३ हा स्मार्टफोन सादर केला होता. हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आला असून याला बर्‍यापैकी प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर आता या मॉडेलचे रोझ गोल्ड रंगातील व्हेरियंट भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. वर नमूद केल्यानुसार ओप्पो एफ ३ हा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन आहे. या मॉडेलमध्ये १६ आणि ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील दुसरा कॅमेरा हा १२० अंशाच्या लेन्सने सज्ज आहे. याच्या मदतीने उत्तम दर्जाचा ग्रुप सेल्फी घेता येईल. तसेच दोन्ही कॅमेर्‍यांच्या एकत्रीत इफेक्टमुळे दर्जेदार सेल्फी काढता येतील असा दावा कंपनीने केला आहे. यात स्मार्ट फेशियल हे फिचर इनबिल्ट स्वरूपात देण्यात आले आहे. ओप्पो एफ ३ या स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेचे चित्रीकरण करणे शक्य आहे. 

उर्वरित फिचर्सचा विचार करता ओप्पो एफ ३ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा अर्थात फुल एचडी क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले प्रदान करण्यात आला असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असेल. १.५ गेगाहर्टझ ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी६७५०टी या प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. हा स्मार्टफोन  अँड्रॉइडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा कलर ३.० हा युजर इंटरफेस असेल. तर यात ३२०० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.