शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

ेसावेडीतील रस्त्यांची लागली वाट महापालिका प्रशासनाचा ढिसाळ कारभार : रस्त्यावरचा प्रवासाने नागरिक त्रस्त

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

अहमदनगर : सावेडी उपनगरामधील महत्त्वाचे असलेल्या दोन रस्त्यांची वाट लागल्याने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक आणि झोपडी कॅन्टीन ते प्रोफेसर चौक या रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना अक्षरक्ष: वाहन चालविणे कंटाळवाणे झाले आहे.

अहमदनगर : सावेडी उपनगरामधील महत्त्वाचे असलेल्या दोन रस्त्यांची वाट लागल्याने सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक आणि झोपडी कॅन्टीन ते प्रोफेसर चौक या रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना अक्षरक्ष: वाहन चालविणे कंटाळवाणे झाले आहे.
मनमाड रोडवरील प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक या रस्त्याची चाळण झाली आहे. रस्त्याच्या अनेक भागातील पूर्वीचे डांबरीकरण उखडले आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे आणि ठिकठिकाणी चढउतार झाले आहेत. याच रस्त्यावर एक नामांकित व्यायामशाळा असल्याने आधीच रस्त्याच्या दुतर्फा वाहने रस्त्यावरच उभी राहतात. त्यात रस्त्याची दुर्दशा असल्याने नागरिकही रस्त्यावरून जाण्यास कंटाळले आहेत. मनमाड रोडवरून पाईपलाईन रोडकडे जाणार्‍या मार्गावर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मनमाड रोडकडे अथवा मनमाड रोडवरून सावेडी व पाईपलाईन रोडवर जाण्याचा मार्ग सध्या बंद आहे. त्यामुळे सर्वच नागरिक प्रेमदान चौक ते प्रोफेसर या रस्त्यांचा मार्ग ये-जा करण्यासाठी पसंत करतात. मात्र या रस्त्याची दुर्दशा झाल्याने नागरिक वैतागले आहेत.
झोपडी कॅन्टीन ते तोफखाना पोलीस ठाणे ते प्रोफेसर कॉलनी या रस्त्यावरही खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात येथे होत आहेत. या रस्त्याची संपूर्ण चाळण झालेली आहे. काही भागात जलवाहिन्या फुटल्याने या रस्त्यावर हमखास रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत आहेत.
दोन्ही रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाची कामे मंजूर असून त्यासाठी निधीही उपलब्ध आहे. रस्त्यामधील जलवाहिन्यांची कामे रखडल्याने तसेच खडी मिळत नसल्याचे कारण देत या रस्त्याचे काम रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी रिलायन्स कंपनीने रस्ते खोदाईपोटी दिलेल्या नुकसान भरपाई निधीतून या रस्त्यांची कामे करण्यात आली होती. मात्र दोन वर्षातच रस्त्यांची दाणादाण उडाली. खडबडीत आणि ओबडधोबड रस्त्यांमुळे नागरिकांना शारीरिक वेदना सहन कराव्या लागत आहेत. दरम्यान याच रस्त्याच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप महापालिकेच्या सभेत एका नगरसेवकाने केला होता. पावसाळ्यापाठोपाठ हिवाळा संपला तरी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत.
-------------
फोटो आहेत.