शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रिमिक्स प्रणालीचा शेवट

By शेखर पाटील | Updated: July 28, 2017 18:51 IST

रिमिक्स ही अँड्रॉइडवर आधारित ऑपरेटींग सिस्टीम बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे यावर आधारित उपकरणांना भविष्यात सुरक्षाविषयक बाबींना तोंड द्यावे लागेल.

रिमिक्स ही अँड्रॉइडवर आधारित ऑपरेटींग सिस्टीम बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे यावर आधारित उपकरणांना भविष्यात सुरक्षाविषयक बाबींना तोंड द्यावे लागेल.

जिडे टेक्नॉलॉजी या कंपनीने रिमिक्स ऑपरेटींग सिस्टीमला विकसित केले होते. ही सिस्टीम अँड्रॉइडपासून विकसित करण्यात आली असली तरी यात विंडोजप्रमाणे टास्क बार देण्यात आला आहे. यावरून विविध सॉफ्टवेअर्सला सहजगत्या कार्यरत करता येते. या प्रणालीत मल्टी-टास्कींगची प्रक्रिया सुलभ पध्दतीने होत असल्याचा दावा करण्यात आला होता. याची खासियत म्हणजे यात गुगल प्ले स्टोअर देण्यात आले असून याच्या मदतीने कुणीही अँड्रॉइड अ‍ॅपचा वापर करू शकतो. ही सिस्टीम खास करून संगणक आणि लॅपटॉपसाठी वापरली जात होती. अर्थात रिमिक्स प्रणालीवर चालणार्‍या या उपकरणांवर स्मार्टफोन अथवा टॅबलेटप्रमाणे अँड्रॉइड अ‍ॅप वापरण्याची सुविधा मिळत असल्याचे यापासून मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या. मात्र याची पूर्तता झाली नाही. काही कंपन्यांनी यावर आधारित उपकरणे बाजारपेठेत उतारली तरी त्याला फारसा प्रतिसाद लाभला नाही. यामुळे जिडे टेक्नॉलॉजीने ही प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात आगामी काळात रिमीक्ससाठी कोणतेही सिक्युरिटी अपडेटदेखील12 मिळणार नाहीत. यामुळे या ऑपरेटींग सिस्टीमवर आधारित उपकरणे घेणार्‍यांची गोची होणार आहे.

तर दुसरीकडे जिडे टेक्नॉलॉजीने आपले लक्ष पूर्णपणे कार्पोरेट ग्राहकांवर केंद्रीत करणार असल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात संबंधीत कंपनीतर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात विवरण देण्यात आले आहे. (hyperlink :- http://www.jide.com) यानुसार रिमिक्स प्रणालीसोबत रिमिक्स आयओ आणि रिमिक्स आयओ प्लस (hyperlink:- https://www.kickstarter.com/projects/jidetech/remix-io-a-4k-nougat-powered-all-in-one-device) ही दोन उपकरणेदेखील मागे घेण्यात आली असून ‘किकस्टार्टर’च्या माध्यमातून याला खरेदी करणार्‍यांना त्यांचे पैसे परत दिले जाणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे गुगलने क्रोमबुकच्या माध्यमातून अँड्रॉइडची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला असून यासोबत अ‍ॅपलेनेही आयपॅडला डेस्कटॉपचा पर्याय म्हणून सक्षम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्‍वभूमिवर रिमिक्स ऑपरेटींग प्रणालीने घेतलेला निरोप हा अनाकलनीय वाटत आहे.