शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वनप्लस ५टी स्मार्टफोनची लाव्हा रेड आवृत्ती

By शेखर पाटील | Updated: January 12, 2018 11:38 IST

वनप्लस कंपनीने आपल्या वन प्लस ५टी या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची लाव्हा रेड या रंगातील नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

वनप्लस कंपनीने आपल्या वन प्लस ५टी या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनची लाव्हा रेड या रंगातील नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

वनप्लस ५टी स्मार्टफोनची लाव्हा रेड आवृत्ती फक्त ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेज या व्हेरियंटसाठी सादर करण्यात आली आहे. वनप्लस ५टी या मॉडेलची मध्यंतरी स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन तर अलीकडेच स्टँडस्टोन व्हाईट या आवृत्त्या सादर करण्यात आल्या आहेत. यात आता लाव्हा रेड या आवृत्तीची भर पडणार आहे. नावातच नमूद असल्यानुसार या आवृत्तीचा रंग लाल असेल. याचा अपवाद वगळता यात आधीचेच सर्व फिचर्स असतील. 

वनप्लस ५ टी या स्मार्टफोनमध्ये ६.०१ इंच आकारमानाचा आणि १०८० बाय १९२० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा व १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा २.५डी फुल ऑप्टीक डिस्प्ले आहे. यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात अतिशय गतीमान असा ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असेल. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्स सोनी आयएमक्स३९८ सेन्सरयुक्त असेल. तर दुसरा कॅमेरा एफ/१.७ अपार्चरसह २० मेगापिक्सल्स सोनी आयएमएक्स३७६के सेन्सरयुक्त देण्यात आला आहे. याच्या मदतीने ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने फोर-के तर ६० फ्रेम्स प्रति सेकंद गतीने फुल हाय डेफिनेशनचे व्हिडीओ रेकॉर्डींग करता येणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा सोनी आयएमएक्स३७१ सेन्सरयुक्त फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने एचडी व्हिडीओ रेकॉर्डींग करणे शक्य आहे. 

वनप्लस ५टी हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सीजन ओएस ४.७.० या प्रणालीवर चालणारा आहे. यात फेस अनलॉक हे विशेष फिचर देण्यात आले आहे.  तर यात डॅशचार्ज या फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ३,३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची लाव्हा रेड ही आवृत्ती आधीच्याच म्हणजे ३७,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल