शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Budget Smartwach: हार्ट रेट मॉनिटर आणि SpO2 सेन्सर असलेला Realme Watch T1 भारतीय लाँचच्या मार्गावर; जाणून घ्या 

By सिद्धेश जाधव | Updated: December 3, 2021 15:07 IST

Budget Smartwach Realme Watch T1: Realme Watch T1 चीनमध्ये Heart Rate Monitor, SpO2 Sensor आणि स्लीप अ‍ॅनालिसीस अशा फीचर्ससह सादर करण्यात आला आहे.

Budget Smartwach: Realme नं ऑक्टोबरमध्ये चिनी बाजारात आपला Realme Watch T1 नावाचा Smartwatch सादर केला होता. या वॉचमध्ये Heart Rate Monitor, SpO2 Sensor आणि स्लीप अ‍ॅनालिसीस असे फीचर्स देण्यात आले होते. आता कंपनी हा स्मार्टवॉच भारतात सादर करू शकते. हा रियलमी स्मार्टवॉच कथितरित्या भारतीय स्टँडर्ड ब्यूरो (BIS) वेबसाईटवर दिसला आहे. Realme Watch T1 चा मॉडेल नंबर RMW2103 BIS लिस्टिंगमध्ये दिसला आहे, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे. त्यामुळे हा वॉचचा भारतीय लाँच जास्त दूर नसल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.  

Realme Watch T1 चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी वॉच टी1 मध्ये 1.3 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वर्तुळाकार वॉच स्टेनलेस स्टिल फ्रेम आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करतो. म्हणजे युजर्स थेट या स्मार्टवॉचवरून व्हॉइस कॉल रिसिव्ह करू शकतात. यातील 4 जीबी स्टोरेजचा वापर म्यूजिक सेव्ह करण्यासाठी केला जाऊ शकतो.   

Realme Watch T1 मध्ये अ‍ॅक्सेलेरोमीटर, अँबियंट लाईट सेन्सर, जायरोस्कोप, जियोमॅग्नेटिक सेन्सरसह हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन असे हेल्थ सेन्सर मिळतात. जे रियल-टाइम हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 मॉनिटरिंग आणि स्लीप अ‍ॅनालिसिस करण्यास मदत करतात. यात बॅडमिंटन, इलिप्टिकल, हायकिंग आणि वॉकिंगसह 110 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.   

हा स्मार्टवॉच 5ATM (50 मीटर) वॉटरप्रूफ देखील आहे. त्यामुळे पाण्यात देखील याचा वापर करता येईल. रियलमी वॉट टी1 मध्ये फास्ट मॅग्नेटिक चार्जिंग सपोर्ट मिळतो. यातील 228mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.   

Realme Watch T1 ची किंमत  

Realme Watch T1 ची किंमत 699 चायनीज युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत 8,200 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. कंपनीने रियलमी वॉच टी1 ब्लॅक, मिंट आणि ऑलिव ग्रीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञान