शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Realme Pad Tablet: Android 11 सह येतोय Realme चा नवा स्वस्त Tablet; देणार का सॅमसंग-शाओमीला मात?  

By सिद्धेश जाधव | Updated: December 9, 2021 12:33 IST

Realme Pad Tablet: Realme चा नवा टॅबलेट गिकबेंचच्या लिस्टिंगमधून समोर आला आहे. लिस्टिंगवरून हा टॅब बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाईल, असं वाटतंय.

Realme नं काही दिवसांपूर्वी आपला पहिला टॅबलेट Realme Pad लाँच केला होता. आता रियलमी अजून एका टॅबलेटवर काम करत आहे, जो Geekbench वर Realme Pad नावानं लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या टॅबलेटच्या रॅम, स्टोरेज ऑपरेटिंग सिस्टम, मॉडेल नंबर आणि चिपसेटची माहिती मिळाली आहे.  

New Realme Pad Tablet 

Geekbench वर रियलमीचा आगामी टॅबलेट RMP2105 या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आहे. हा टॅबलेट परवडणाऱ्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो. गिकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये या टॅबलेटला 363 आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1,330 पॉईंट्स मिळाले आहेत. या लिस्टिंगमधून ऑक्टाकोर Unisoc प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. या प्रोसेसरला 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजची जोड दिली जाऊ शकते. रियलमीचा आगामी टॅबलेट Android 11 वर चालेल.  

जुन्या Realme Pad चे स्पेसिफिकेशन्स   

Realme Pad स्लिम डिजाइन आणि एयरक्राफ्ट ग्रेड अ‍ॅल्युमिनियम बॉडीसह सादर करण्यात आला आहे. या रियलमी टॅबमध्ये बॅक पॅनलवर सिंगल कॅमेरा मिळतो. रियलमी पॅडची जाडी फक्त 6.4mm आणि वजन 440 ग्राम आहे. या टॅबलेटमध्ये 10.4 इंचाचा WUXGA+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 2000X1200 पिक्सल आणि बॉडी टू स्क्रीन रेश्यो 82.5 टक्के आहे. हा टॅब Android 11 आधारित Realme UI वर चालतो.   

प्रोसेसिंगसाठी Realme Pad मध्ये मीडियाटेकचा Helio G80 चिपसेट मिळतो. या टॅबलेटमधील 7100mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. तसेच रिवर्स चार्जिंग सपोर्टमुळे या टॅबचा वापर पॉवरबँकप्रमाणे करता येतो. हा टॅब सिंगल चार्जमध्ये 12 तास व्हिडीओ प्लेबॅक आणि 65 दिवस स्टँडबाय टाइम देतो. या रियलमी पॅडमध्ये फ्रंट आणि बॅक पॅनलवर 8MP चा कॅमेरा सेन्सर मिळतो. यारील चार स्पिकर Dolby Atmos आणि अडॅप्टिव सराउंड साउंडला सपोर्ट करतात.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान