शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

ठरलं! रेडमीला अजून एक झटका देण्याची Realme ची तयारी, 20 एप्रिलला नव्या Smartphone चा लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: April 16, 2022 11:56 IST

Realme आपले तीन नवीन स्मार्टफोन Realme Q5 सीरिज सादर करू शकते. आता यातील Realme Q5 Pro स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे.  

Realme अत्यंत वेगाने आपला स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवत आहे. आता कंपनीच्या नव्या सीरिजची माहिती समोर आली आहे. कंपनी आपल्या Realme Q सीरिजमध्ये Realme Q5, Realme Q5i आणि Realme Q5 Pro स्मार्टफोन लाँच करू शकते. यातील Realme Q5 Pro स्मार्टफोन चीनमध्ये 20 एप्रिलला लाँच होणार आहे, अशी माहिती कंपनीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून मिळाली आहे.  

Realme Q5 Pro लिस्टिंग 

Realme Q5 Pro स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर RMX3372 नंबरसह लिस्ट करण्यात आला होता. तसेच फोन सर्टिफिकेशन साईट 3C वर देखील दिसला होता. गिकबेंचच्या सिंगल कोर टेस्टमध्ये 1,003 पॉईंट्स आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 3,153 पॉईंट्स या डिवाइसनं मिळवले आहेत. या लिस्टिंगमधून आणि काही मीडिया रिपोर्ट्समधून मोबाईलच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.  

गिकबेंचच्या लिस्टिंगनुसार, Realme Q5 Pro हा स्मार्टफोन Android 12 वर चालेल. त्याचबरोबर फोनमध्ये 8GB रॅम दिला जाऊ शकतो. इथे हा फोन ‘Kona’ नावाच्या ऑक्टाकोर Qualcomm प्रोसेसरसह लिस्ट झाला आहे, जे Snapdragon 870 SoC चं कोडनेम आहे. 3C लिस्टिंगमधून स्मार्टफोनच्या 80W फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली आहे.  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Realme Q5 Pro स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा फुलएचडी+ (1,080×2,400 पिक्सल) OLED डिस्प्ले मिळेल. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल. Realme Q5 सीरीज गेल्यावर्षी आलेल्या Realme Q3 सीरीजची जागा घेईल. परंतु ही सीरिज भारतात लाँच केली जाईल की नाही हे मात्र इतक्यात सांगता येणार नाही. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान