शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल चार्जमध्ये 36 दिवसांचा बॅकअप! 10 हजारांच्या आत दमदार Narzo 50i Prime लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: June 23, 2022 12:42 IST

Realme Narzo 50i Prime स्मार्टफोनमध्ये 4GB RAM, UniSoC T612 प्रोसेसर आणि 5000mAh battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.

Realme नं आपल्या नारजो सीरीजमध्ये Realme Narzo 50i Prime स्मार्टफोनची भर टाकली आहे. कंपनीनं या फोनची किंमत अत्यंत कमी ठेवली आहे. तरीही यात 4GB RAM, UniSoC T612 प्रोसेसर आणि 5000mAh battery असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. Android Go Edition वर चालणारा हा फोन सध्या चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती.  

Realme Narzo 50i Prime चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Narzo 50i Prime अँड्रॉइड 11 ओएसच्या ‘गो एडिशन’ वर लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनला कमी रॅम आणि स्टोरेज देखील पुरेशी ठरते. स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत ग्राफिक्ससाठी माली जी52 जीपीयू देखील मिळतो. फोनमध्ये 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी पर्यंतची मेमरी देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते.   

रियलमी नारजो 50आय प्राईममध्ये 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या ड्युअल सिम 4जी फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत. फोटोग्राफीसाठी 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 4एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. तर फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 10वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये हा फोन 36 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे.  

Realme Narzo 50i Prime ची किंमत 

रियलमी नारजो 50आय प्राईमच्या 3 जीबी रॅम 32 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत चीनमध्ये 100 डॉलर्स अर्थात 7,850 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. तर 4GB RAM व 64GB Storage असलेला मॉडेल 110 डॉलर्स (जवळपास 8,600 रुपये)  मध्ये विकत घेता येईल. फोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान