शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

108MP कॅमेरा असलेला Realme स्मार्टफोन ‘या’ दिवशी येईल भारतात; बजेटमध्ये मिळणार दमदार परफॉर्मन्स 

By सिद्धेश जाधव | Updated: April 4, 2022 12:01 IST

Realme 9 4G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. हा फोन 108MP च्या कॅमेऱ्यासह सादर केला जाईल.  

गेले कित्येक दिवस Realme 9 4G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर येत आहे. हा फोन 108MP चा कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल, अशी चर्चा आहे. आता स्वतः रियलमी इंडियानं ट्वीट करून सांगितले आहे की, हा स्मार्टफोन 7 एप्रिलला भारतात सादर करण्यात येईल. त्याचबरोबर फ्लॅगशिप Realme GT 2 Pro, Realme Book Prime लॅपटॉप, Realme Buds Air 3, आणि Realme FHD TV Stick देखील भारतीयांच्या भेटीला येतील.  

Realme India च्या ट्विटर अकॉउंटवरून कंपनीनं बहुप्रतीक्षित Realme 9 4G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. येत्या 7 एप्रिलला दुपारी 12:30 PM वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या लाँच इव्हेंटमधून हा फोन सादर केला जाईल. Realme 9 4G मधील 108MP ISOCELL HM6 इमेज सेन्सरला देखील कंपनीनं दुजोरा दिला आहे.  

Realme 9 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

लिक्सनुसार, रियलमी 9 4जी फोनमध्ये सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल, जो 90Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1,000 नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon प्रोसेसर देण्यात येईल. या स्मार्टफोनचे दोन रॅम व्हेरिएंट बाजारात येतील, ज्यात 6GB आणि 8GB RAM असेल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 128GB स्टोरेज मिळेल.  

फोटोग्राफीसाठी या आगामी रियलमी फोनमध्ये 108MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच, फ्रंटला 16MP चा सेन्सर सेल्फी कॅप्चर करेल. या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल.  

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड