शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Realme ची कमाल! स्वस्तात मिळणार जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा; स्पेसिफिकेशन लीक 

By सिद्धेश जाधव | Updated: April 2, 2022 12:04 IST

Realme 9 सीरिजमध्ये लवकरच Realme 9 4G स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. हा फोन 108MP च्या मुख्य कॅमेरा सेन्सरसह बाजारात येईल.  

Realme 9 4G स्मार्टफोन गेले कित्येक दिवस चर्चेचा विषय बनला आहे. या फोनमध्ये 108MP चा जगातील सर्वात मोठा कॅमेरा सेन्सर देण्यात येईल, अशी बातमी याआधीच आली आहे. आता या स्मार्टफोनच्या इंडोनेशियन लाँचचा पोस्टर ऑनलाईन लीक झाला आहे. या पोस्टरवरून फक्त मोबाईलचा लाँच निश्चित झाला नाही तर फोनच्या कलर व्हेरिएंटची माहिती देखील मिळाली आहे.  

टिप्सटर अनुज अत्रीनं Realme 9 4G च्या इंडोनेशियन लाँचचा पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमध्ये फोनच्या तीन कलर व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे. हा डिवाइस ब्लॅक, व्हाईट आणि गोल्डन कलरमध्ये सादर केला जाईल. पोस्टरवरून फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला देखील येईल.  

Realme 9 4G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

लिक्सनुसार, रियलमी 9 4जी फोनमध्ये सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon प्रोसेसर देण्यात येईल. या स्मार्टफोनचे दोन रॅम व्हेरिएंट बाजारात येतील, ज्यात 6GB आणि 8GB RAM असेल. दोन्ही व्हेरिएंटमध्ये 128GB स्टोरेज मिळेल. फोटोग्राफीसाठी या आगामी रियलमी फोनमध्ये 108MP च्या मुख्य कॅमेऱ्यासह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तसेच, फ्रंटला 16MP चा सेन्सर सेल्फी कॅप्चर करेल. या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी मिळू शकते , जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.  

कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये या स्मार्टफोनसाठी दोन नावं समोर आली आहेत. हा फोन Realme 9 4G म्हणून भारतात दाखल होऊ शकतो किंवा एसई व्हर्जन प्रमाणे कंपनी या स्मार्टफोनला Realme 9 SuperZoom असं नाव देखील देऊ शकते. आतापर्यंत आलेल्या Realme 9 सीरिजच्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये जगातील सर्वात मोठा फोन कॅमेरा देण्यात आला नाही. परंतु Realme 8 Pro मध्ये कंपनीनं 108MP चा सेन्सर दिला होता.   

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड