शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रियलमीची कमाल! Dimensity 810 प्रोसेसरसह जगातील पहिला स्मार्टफोन Realme 8S 5G भारतात सादर 

By सिद्धेश जाधव | Updated: September 9, 2021 14:47 IST

Realme 8S 5G Price: Realme 8S 5G स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिएंटसह भारतात सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सादर झाला आहे.

ठळक मुद्देRealme 8S 5G स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिएंटसह भारतात सादर करण्यात आला आहे.Realme 8S 5G जगातील पहिला MediaTek Dimensity 810 SoC असलेला फोन आहे.

रियलमीने आज भारतात एक-दोन नव्हे तर चार डिवाइस सादर केले आहेत. यात Realme 8i, Realme 8s 5G आणि Realme Pad सह रियलमी पोर्टेबल ब्लूटूथ स्पिकरचा समावेश आहे. या लेखात आपण जगातील सर्वात पहिल्या MediaTek Dimensity 810 SoC सह येणाऱ्या स्मार्टफोनची माहिती घेणार पाहतो. या प्रोसेसरसह कंपनीने Realme 8S 5G स्मार्टफोन सादर केला आहे.  

Realme 8S 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Realme 8S 5G जगातील पहिला MediaTek Dimensity 810 SoC असलेला फोन आहे. प्रोसेसरसह कंपनीने ग्राफिक्ससाठी Mali-G57 MC2 जीपीयू दिला आहे. तसेच हा फोन 8GB पर्यंतच्या LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनमध्ये 5GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम देखील दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 2.4GHz/5.1GHz/5.8GHz WiFi, 802.11 a/b/g/n/ac आणि Bluetooth 5.1 असे ऑप्शन्स मिळतात.  

Realme 8S 5G मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो. हा पांडा ग्लासच्या सुरक्षेसह येणारा हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा HD मेन कॅमेरा, 2 मेगापिक्सलची B&W पोर्टेट लेन्स आणि 2 मेगापिक्सलची 4cm मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme 8s 5G मध्ये पावर बॅकअपसाठी कंपनीने 5000mAh ची बॅटरी 33 वॉट डार्ट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.  

Realme 8S 5G ची किंमत 

Realme 8S 5G स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिएंटसह भारतात सादर करण्यात आला आहे. या फोनचा 6GB RAM व 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सादर झाला आहे. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. हा फोन Universe Blue आणि Universe Purple कलरमध्ये ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर 13 सप्टेंबरपासून उपलब्ध होईल.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड