शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ओप्पो ए3एस दाखल होण्यासाठी सज्ज

By शेखर पाटील | Updated: July 9, 2018 12:50 IST

ओप्पो कंपनी लवकरच आपला ए३एस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

ओप्पो कंपनी लवकरच आपला ए३एस हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. ओप्पो ए३एस हे मॉडेल एप्रिल महिन्यात चीनी बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे. आता हाच स्मार्टफोन येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. कंपनीने याला दुजोरा दिला असल्यामुळे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. बहुतांश चिनी कंपन्यांनी अलीकडच्या काळात मिड रेंजवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. मध्यम मूल्यात अतिशय उत्तमोत्तम फीचर्सचा हा पॅटर्न आता ओप्पोदेखील अवलंबत असल्याचे उघड झाले आहे. या अनुषंगाने ओप्पो ए३एस या मॉडेलमध्येही अनेक उत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

ओप्पो ए३एस या मॉडेलमध्ये सुपर फुल स्क्रीन या प्रकारातील डिस्प्ले असणारा आहे. हा डिस्प्ले १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा, बेझललेस म्हणजेच कडा विरहीत आहे. यामध्ये आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणे वरील भागात नॉच प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले ६.२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा (१५२० बाय ७२० पिक्सल्स) आहे. यामध्ये अतिशय गतीमान असा क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर ४५० प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २/३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६/३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्सचा ड्युअल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आलेला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असणार आहे. या कॅमेर्‍यात एआय ब्युटी टेक्नॉलॉजी २.० देण्यात आलेली आहे. यातील बॅटरी ४२३० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असेल.

टॅग्स :oppoओप्पोtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल