राज्यात पाऊस परतणार
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
कोकणात सर्वदूर पाऊस
राज्यात पाऊस परतणार
कोकणात सर्वदूर पाऊसपुणे : अनेक दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमधून गायब झालेला पाऊस पुन्हा परतणार आहे. पुढील ४ दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोकणात सर्वदूर पाऊस पडला. याव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पाऊस पडला नाही.कोकणात मॉन्सून सक्रिय असल्याने तेथे सर्वदूर पाऊस पडत आहे. गेल्या २४ तासांत भिवंडी येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पाऊस पडला. त्यापाठोपाठ कल्याण, माथेरान, पनवेलमध्ये १००, अंबरनाथमध्ये ९०, ठाणे येथे ८०, देवगड, कुडाळ, उल्हासनगर, विक्रमगड येथे ७०, दापोली, हर्णे, कर्जत येथे ६०, महाड, शहापूर, महाबळेश्वर येथे ५०, गुहागर, जव्हार, कणकवली, रत्नागिरी, उरण, गगनबावडा, पुणे-वडगाव मावळ येथे ४०, चिपळूण, पालघर, पोलादपूर, राजापूर, रोहा, संगमेश्वर, इगतपुरी येथे ३०, सावंतवाडी, श्रीवर्धन, राधानगरी, सिन्नर येथे २०, मालवण, मुंबई, मुरूड, पुणे-आंबेगाव-जुन्नर-राजगुरुनगर, कोल्हापूर, ओझर, संगमनेर, शाहूवाडी येथे १० मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यांवरही जोरदार पाऊस पडत आहे. लोणावळा घाटात १००, डुंगरवाडी, ताम्हिणी, वळवण, खंद घाटात ७०, भिवपुरी घाटात ६०, वाणगाव घाटात ५०, शिदोटा, दावडी घाटात ४०, शिरगाव, ठाकूरवाडी, अम्बोणे, कोयना घाटात ३० मिमी पाऊस पडला.उद्या (दि. २७ ऑगस्ट) कोकण आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यापाठोपाठ दि. २८ व २९ रोजी मराठवाडा व विदर्भात, तर ३० ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.००(चौकट)पुण्यात पावसाची विश्रांतीपुण्यात मंगळवारी अचानक पाऊस सुरू झाल्याने पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, बुधवारी दिवसभर शहरात पावसाची एक सरही पडली नाही. आज पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते. शहरात दिवसभर ढगाळ हवामान होते. पुढील २४ तासांत शहरात जोरदार पावसाची शक्यता नाही. पावसाच्या एक किंवा दोन सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.०००