शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

न्हावेखाडीचा विकास तीन टप्प्यांत पूर्ण करणार - प्रज्ञा सरवदे

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

पनवेल : विधायक कामातून न्हावेखाडीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सिडको सज्ज झाली असून तीन टप्प्यांत याठिकाणची कामे पूर्ण केली जातील, असा विश्वास दक्षता विभागाच्या प्रमुख तथा अप्पर पोलीस महासंचालिका प्रज्ञा सरवदे यांनी व्यक्त केला. न्हावेखाडी संघर्ष समितीबरोबर झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

पनवेल : विधायक कामातून न्हावेखाडीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सिडको सज्ज झाली असून तीन टप्प्यांत याठिकाणची कामे पूर्ण केली जातील, असा विश्वास दक्षता विभागाच्या प्रमुख तथा अप्पर पोलीस महासंचालिका प्रज्ञा सरवदे यांनी व्यक्त केला. न्हावेखाडी संघर्ष समितीबरोबर झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या निर्देशानुसार, गेल्या महिन्यातच सिडकोच्या अधिकार्‍यांनी न्हावेखाडी परिसराची पाहणी केली होती. यावेळी ग्रामस्थांनी परिसरातील गावांच्या झालेल्या दुरवस्थेची माहिती दिली. येथील ग्रामस्थांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचे आश्वासन यावेळी सरवदे यांनी दिले. या आश्वासनाची पूर्तता सिडकोने शनिवारी झालेल्या बैठकीत केली. न्हावेखाडी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत यावेळी सिडकोचे मुख्य अभियंता के. वरखेडकर, दक्षता विभागाच्या प्रमुख प्रज्ञा सरवदे , ए.बी. पवार उपस्थित होते. संघर्ष समितीचे नेतृत्व कांतीलाल कडू यांनी केले. यावेळी कामांची टप्प्याटप्प्यात विभागणी सिडको अधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आली. त्यामध्ये पहिला टप्पा ३० जूनपर्यंत, दुसरा टप्पा ३१ जुलै, तर तिसरा टप्पा ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार असल्याचे सिडकोचे मुख्य अभियंता के. वरखेडकर यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले.
परिसरातील शाळेची इमारत, शौचालये, अंतर्गत नाले, स्मशानभूमी आदीच्या कामांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले जाणार आहे. याठिकाणच्या असणार्‍या गावांना धोका ओळखून अस्तित्वात असलेल्या बंधार्‍याची डागडुजी आणि वाढीव काम दुसर्‍या टप्प्यात करण्याचे ठरले. काही ठिकाणी असलेली खारफुटी विकासकामांच्या आड येत असल्यास पर्यावरण खात्याची परवानगी घेवून पुढील विकासकामे केली जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. गावातील मुख्य रस्ते, मंदिरासमोरचे सुशोभीकरण आदी दुसर्‍या टप्प्यात करण्याचे यावेळी ठरले. उड्डाणपूल, मैदान, बगिचा, नाना नानी पार्क, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्यायामशाळा, वाचनालय आदीचा तिसरा टप्प्यात समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये २५ कामांचा समावेश असून १० कोटींची ही विकासकामे न्हावेखाडी परिसरात होणार आहेत. ही विकासकामे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मिळावी यासाठी काही तरतूद सिडको करणार आहे का, असा प्रश्न यावेळी कडू यांनी विचारला असता ई -टेंडरिंगसाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना प्रशिक्षण दिले जाईल, असे आश्वासन के. वरखेडक र यांनी दिले.
यावेळी उपस्थितांमध्ये टी.एम .म्हात्रे, गोपाळ कडू, सी.ठाकूर, अरुण ठाकूर, प्रकाश कडू, राजन कडू, शैलेश ठाकूर, विष्णू ठाकूर यांच्यासह तीस जणांच्या प्रतिनिधी मंडळाचा या बैठकीत समावेश होता. (प्रतिनिधी)