शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

11GB रॅम असलेला दमदार 5G स्मार्टफोन आला भारतात; फीचर्स पाहून रेडमी-रियलमीला फुटला घाम

By सिद्धेश जाधव | Updated: March 28, 2022 15:38 IST

Poco X4 Pro 5G स्मार्टफोन भारतात 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच झाला आहे.  

Poco X4 Pro 5G स्मार्टफोननं भारतातील मिड रेंज सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे. आधीच या सेगमेंटमध्ये रेडमी, रियलमी, मोटोरोला, आयकू आणि सॅमसंगची गर्दी आहे त्यात आता पोकोची भर पडली आहे. कंपनीनं हा फोन 11GB RAM, 5000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सादर केला आहे. चला जाणून घेऊया Poco X4 Pro 5G ची संपूर्ण माहिती.  

Poco X4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये कंपनीनं 6.67 इंचाच्या फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा वापर केला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. या मोबाईलमध्ये अँड्रॉइड 11 आधारित MIUI 13 देण्यात आला आहे. प्रोसेसरसाठी यात स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. पोकोच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 11GB पर्यंत रॅम वाढवता येईल.  

फोटोग्राफीसाठी Poco X4 Pro 5G मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या पोको फोनमधील 5000mAh ची बॅटरी 67 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जी फक्त 15 मिनिटांत फोन 50 टक्के चार्ज करू शकते.  

Poco X4 Pro 5G ची किंमत 

Poco X4 Pro 5G चे तीन व्हेरिएंट भारतात आले आहेत. 18,999 रुपयांमध्ये या फोनचा 6GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 21,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन लेजर ब्लू, पोको येलो आणि लेजर ब्लॅक रंगात 5 एप्रिलपासून Flipkart वर उपलब्ध होईल. 

टॅग्स :MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड