शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पॅनासोनिकचा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: August 17, 2017 12:14 IST

पॅनासोनिक कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी एल्युगा आय२ अ‍ॅक्टीव्ह हा किफायतशीर दरातला स्मार्टफोन सादर केला आहे.

पॅनासोनिक एल्युगा आय२ अ‍ॅक्टीव्ह हे मॉडेल गोल्ड, रोझ गोल्ड आणि ग्रे या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध केले आहे. याच्या एक जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्य ७,१९० तर दोन जीबी व्हेरियंटचे मूल्य ७,९९० रूपये इतके असेल. वर नमूद केल्यानुसार हा स्मार्टफोन खास सेल्फी प्रेमींसाठी सादर करण्यात आला आहे. यात सेल्फी प्रतिमा आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी काढता येत असल्याचा दावा पॅनोसोनिक कंपनीने केला आहे. तर यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा असून यात एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस हे फिचर्स असतील.

पॅनोसोनिक एल्युगा आय२ अ‍ॅक्टीव्ह या मॉडेलच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज प्रदान करण्यात आले असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात २२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. हे मॉडेल फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्कला सपोर्ट करणारे आहे. याशिवाय यात फोर-जी, ब्ल्यू-टुथ, जीपीएस, मायक्रो-युएसबी २.०, एफएम रेडिओ आदी फिचर्स असतील. तर यात ड्युअल सीमकार्ड वापरता येणार आहे. पॅनासोनिक एल्युगा आय२ अ‍ॅक्टीव्ह या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले तर क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे.