शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि ए ३ प्रो स्मार्टफोन

By shekhar.dhongade | Updated: August 10, 2017 14:50 IST

पॅनासोनिक कंपनीने आपल्या एल्युगा मालिकेत ए ३ आणि ए ३ प्रो हे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना अनुक्रमे ११,२९० आणि १२,७९० रूपये मूल्यात सादर केले आहेत.

पॅनासोनिक कंपनीने आपल्या एल्युगा मालिकेत ए ३ आणि ए ३ प्रो हे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना अनुक्रमे ११,२९० आणि १२,७९० रूपये मूल्यात सादर केले आहेत.आगामी सणांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात होणार्‍या खरेदीच्या पार्श्‍वभूमिवर, विविध स्मार्टफोन उत्पादक कंपन्या आपले मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत उतारत आहेत. या अनुषंगाने पॅनासोनिक कंपनीने एल्युगा ए ३ आणि एल्युगा ए ३ प्रो हे दोन स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. नावातच नमूद असल्यानुसार हे एल्युगा मालिकेतील मॉडेल्स आहेत. यात प्रोसेसर आणि स्टोअरेज वगळता सर्व फिचर्स समान आहेत.पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ या मॉडेलमध्ये क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसर असून ए ३ प्रो या मॉडेलमध्ये ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक एमटी६७५३ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. अर्थात दुसर्‍या मॉडेलमधील प्रोसेसर हा तुलनेत अधिक गतीमान असेल. तसेच पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ या मॉडेलचे इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी तर ए३ प्रो या मॉडेलचे स्टोअरेज ३२ जीबी इतके असेल. अर्थात दोन्ही मॉडेल्सची रॅम तीन जीबी आहे. तर मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची सुविधा दोन्ही स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. या दोन बाबी वगळता पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि ए ३ प्रो या दोन्ही स्मार्टफोन मधील सर्व फिचर्स समान आहेत.पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि एल्युगा ए ३ प्रो या दोन्ही मॉडेलमध्ये पीडीएएफ आणि एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा मुख्य कॅमेरा असेल. तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा प्रदान करण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती मल्टी-टास्कींग आणि दीर्घ काळच्या बॅकअपसाठी उपयुक्त ठरणारी असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय आदी पर्याय आहेत. तर उर्वरीत फिचर्समध्ये जीपीएस, मायक्रो-युएसबी २.०, फिंगरप्रिंट स्कॅनर, ओटीजी, ड्युअल सीम आदींचा समावेश आहे. पॅनासोनिकचे एल्युगा ए ३ आणि एल्युगा ए ३ प्रो हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या अर्बो या व्हर्च्युअल असिस्टंटने युक्त आहेत. अलीकडच्या काळात सॅमसंग, अ‍ॅपल आदी कंपन्यांच्या फ्लॅगशीप मॉडेलमध्ये त्यांचे व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आले आहेत. मात्र पॅनासोनिकने तुलनेत किफायतशीर मूल्य असणार्‍या स्मार्टफोनमध्येही ही सुविधा प्रदान केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.