शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव स्टोअरेजसह मिळणार पॅनासोनिक पी ७७ स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: September 1, 2017 10:05 IST

पॅनासोनिक कंपनीने फोर-जी व्हिओएलटीई कनेक्टिव्हिटी असणारा पी७७ हा स्मार्टफोन आता १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेजसह लाँच केला आहे.

गेल्या वर्षी पॅनासोनिक पी ७७ हे मॉडेल ६,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आले होते. या मूळ मॉडेलमध्ये ८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज होते. आता हे स्टोअरेज १६ जीबीपर्यंत वाढविण्यात आले असून हे नवीन व्हेरियंट भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्टोअरेज वाढले असले तरी याचे मूल्य कमी करण्यात आले आहे. आता पॅनासोनिक पी ७७ हा स्मार्टफोन ५,२९९ रूपये मूल्यात ग्राहकांना मिळणार आहे. व्हाईट आणि ग्रे या दोन रंगांमध्ये सादर करण्यात आलेले हे मॉडेल ग्राहकांना फक्त फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

पॅनोसोनिक पी ७७ या मॉडेलमधील उर्वरित फिचर्स आधीप्रमाणेच आहेत. अर्थात यात पाच इंच आकाराचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. १ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात ८ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे आहेत. हे मॉडेल अँड्रॉईडच्या लॉलिपॉप प्रणालीवर चालणारे आहे. यातील बॅटरी २,००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. पॅनोसोनिक पी ७७ हा स्मार्टफोन ड्युअल सीमकार्डला सपोर्ट करणारा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान