शहरं
Join us  
Trending Stories
1
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
2
झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
3
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
4
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
5
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
6
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
7
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
8
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
9
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
10
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
11
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
12
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
13
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
14
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
15
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
16
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
17
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
18
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
20
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे

12GB RAM, 60W फास्ट चार्जिंगसह OPPO K9 Pro लाँच; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: September 27, 2021 12:57 IST

Latest Oppo Phone Oppo K9 Pro 5G: Oppo ने आपला नवीन स्मटफोन OPPO K9 Pro चीनमध्ये सादर केला आहे. लवकरच हा फोन भारतसह जागतिक बाजारात उतरवला जाईल.

ओप्पोने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला आहे. कंपनीने हा नवीन मोबाईल फोन OPPO K9 Pro नावाने सादर केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेकच्या फ्लॅगशिप प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 64MP कॅमेरा, 60W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 12GB रॅम असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.  

OPPO K9 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

ओप्पो के9 प्रो मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. ज्याचा आकार 6.43 इंच आणि रिजोल्युह्सन फुलएचडी+ आहे. अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 वर चालणार हा फोन मीडियाटेक डिमेन्सिटी 1200 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच यात UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.  

OPPO K9 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा 5G फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी 65वॉट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीच्या मदतीने फक्त 16 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते.  

OPPO K9 Pro ची किंमत  

ओप्पो के9 चे दोन व्हेरिएंट्स बाजारात आले आहेत. या फोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2199 युआन म्हणजे जवळपास 25,000 रुपये आहे. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 2699 युआन म्हणजे सुमारे 30,500 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन लवकरच जागतिक बाजारात उतरवला जाऊ शकतो. 

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड