शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अधिकृत लाँचपूर्वीच धमाकेदार Oppo A54s अ‍ॅमेझॉनवर झाला लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: October 27, 2021 19:04 IST

New Oppo Phone OPPO A54s Price Launch Details: कंपनीच्या अधिकृत घोषणेच्या आधी नवीन OPPO A54s स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन 4GB RAM, 5000mAh Battery आणि 50MP Camera सह लिस्ट झाला आहे.

गेल्या महिन्यात बातमी आली होती कि OPPO आपल्या ‘ए’ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. आता कंपनीच्या अधिकृत घोषणेच्या आधी नवीन OPPO A54s स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉनच्या लिस्टिंगमधून या फोनच्या फोटो, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची देखील माहिती मिळाली आहे. लवकरच हा स्मार्टफोन विक्रीसाठी देखील उपलब्ध होईल. 

OPPO A54s चे स्पेसिफिकेशन्स 

ओप्पो ए54एस मध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा एक टियरड्रॉप नॉच असलेला आयपीएस एलसीडी पॅनल आहे. हा ओप्पो मोबाईल IPX4 रेटिंगसह सादर केला जाईल. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारित कलरओएस 11.1 वर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी यात मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट दिला जाईल. यात 4GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल.  

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए54एस स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. पॉवर बॅकअपसाठी ओप्पो ए54एस 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5000mAh ची बॅटरी मिळेल. 

OPPO A54s ची किंमत 

अ‍ॅमेझॉनवर OPPO A54s स्मार्टफोन 229.99 युरोमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत 20,000 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन Pearl Blue आणि Crystal Black कलरमध्ये विकत घेता येईल. हा फोन भारतात कधी येईल हे मात्र अजून समजले नाही.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान