शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

OnePlus 9RT India: लाँचपूर्वीच OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 वेबसाईटवर लिस्ट; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: December 10, 2021 20:00 IST

OnePlus 9RT India: OnePlus 9RT किंवा OnePlus Buds Z2 च्या लाँच डेटची अचूक माहिती मिळाली नाही. परंतु या सपोर्ट पेजमुळे लवकरच हे डिवाइस भारतात येणार आहेत हे निश्चित झालं आहे.

OnePlus 9RT India: OnePlus 9RT स्मार्टफोन आणि OnePlus Buds Z2 वायरलेस इयरबड्स लवकरच भारतात येणार आहेत. परंतु आता अधिकृत लाँच पूर्वीच हे दोन्ही डिवाइस वनप्लसच्या अधिकृत वेबसाईटच्या सपोर्ट पेजवर दिसले आहेत. या लिस्टिंगची माहिती 91mobiles नं टिपस्टर मुकुल शर्माच्या हवाल्याने दिली आहे. हे दोन्ही डिवाइस याआधी चीनमध्ये सादर झाले आहेत आणि भारतीय ग्राहक यांची आतुरतेने वाट बघत आहेत.  

लिस्टिंगमधून OnePlus 9RT किंवा OnePlus Buds Z2 च्या लाँच डेटची अचूक माहिती मिळाली नाही. परंतु या सपोर्ट पेजमुळे लवकरच हे डिवाइस भारतात येणार आहेत हे निश्चित झालं आहे. याआधी OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 नोव्हेंबरमध्ये भारतात येतील, असा अंदाज लावण्यात आला होता. परंतु अजूनही हे डिवाइस देशात आले नाहीत. OnePlus 9RT भारतात OnePlus RT नावानं सादर केला जाईल, अशी माहिती देखील गेले कित्येक दिवस येत आहे. लीक आणि रिपोर्ट्सनुसार वनप्लसचा हा स्मार्टफोन भारतात 16 डिसेंबरला लाँच केला जाऊ शकतो.  

OnePlus RT चे स्पेसिफिकेशन्स  

OnePlus RT मध्ये 6.62-चाचा फुल एचडी+ E4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे हा फोन OxygenOS ऐवजी अँड्रॉइड 11 आधारित Oppo च्या ColorOS वर चालतो.    

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे. OnePlus RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.