शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

नू मोबाइलचे चार स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Updated: August 25, 2017 09:17 IST

नू मोबाइल या कंपनीने भारतीय बाजारपेठेत चार स्मार्टफोन लाँच केले असून या सर्व मॉडेल्समध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे.

नू मोबाइलने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करतांना एक्स५, एम३, क्यू६२६ आणि क्यू५०० हे चार स्मार्टफोन ग्राहकांना सादर केले आहेत. हे सर्व स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ऑफलाईन पद्धतीनं म्हणजेच देशभरातल्या शॉपीजमधून उपलब्ध करण्यात येणार आहेत. यांचे मूल्य ९,९९९ ते १५,९९९ रूपयांच्या दरम्यान असेल.

नू क्यू५००नू मोबाइल कंपनीचा हा सर्वात स्वस्त दराचा स्मार्टफोन आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्सचा डिस्प्ले असेल. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येईल. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर उर्वरित फिचर्समध्ये ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदींचा समावेश असेल. 

नू क्यू६२६नू क्यू६२६ या मॉडेलमध्येही पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्सचा डिस्प्ले असेल. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येईल. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर उर्वरित फिचर्समध्ये ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी देण्यात आले आहेत.

नू एम३नू एम३ या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्सचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम दोन जीबी आणि स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या ते तब्बल १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील कॅमेरे ८ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. याशिवाय यात ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदींचा समावेश असेल. तर यातील बॅटरी ३२०० मिलीअँपिअर क्षमतेची देण्यात आली आहे.

नू एक्स ५नू एक्स५ हा स्मार्टफोन ५.५ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी म्हणजे १०८० बाय १९२० पिक्सल्सच्या डिस्प्लेने सज्ज आहे. याची रॅम तीन जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. एलईडी फ्लॅशसह यातील कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. यात एलईडी फ्लॅश, बर्स्ट मोड, पॅनोरामा, लाईव्ह फोटो आदी फिचर्स असतील. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या प्रणालीवर चालणारा असून यात ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, एफएम रेडिओ, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स देण्यात आले आहेत. यात २९५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.