शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Nokia C30 भारतात लाँच; शाओमी-रियलमीला देणार का टक्कर?  

By सिद्धेश जाधव | Updated: October 21, 2021 15:37 IST

Nokia New Phone 2021 Nokia C30 Price in India: नोकियाने जागतिक बाजारात सादर केलेला Nokia C30 आता भारतात आणला आहे. या फोनमध्ये 6000mAh Battery, 13MP camera आणि 3GB RAM देण्यात आला आहे.  

नोकियाने भारतात आपला नवीन Nokia C30 लाँच केला आहे. जागतिक बाजारात लाँच झाल्यानंतर बजेट सेगमेंटमधील हा फोन कंपनीने जियोसोबत मिळून सादर केला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आणि 3GB रॅम मिळतो. चला जाणून घेऊया या Nokia C30 चे स्पेक्स, फीचर्स, किंमत आणि त्यासोबत मिळणाऱ्या ऑफर्स.  

Nokia C30 Price In India And Offers 

नोकियाने या फोनचे दोन व्हेरिएंट देशात आणले आहेत. यातील 3GB RAM आणि 32GB स्टोरेज असलेल्या छोट्या व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर 4GB RAM आणि 64GB स्टोरेज ऑप्शनसाठी 11,999 रुपये मोजावे लागतील. या स्मार्टफोनच्या खरेदीवर Jio Exclusive ऑफर अंतर्गत 1000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल.तसेच 249 रुपयांचा रिचार्ज करणाऱ्या जियो ग्राहकांना 4000 रुपये पर्यंतचे फायदे मिळतील.  

Nokia C30 स्पेसिफिकेशन्स  

नोकिया सी30 स्मार्टफोन कंपनीने 6.82-इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह सादर केला आहे. हा ‘वी’ नॉच असलेला डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. Nokia C30 स्मार्टफोन 1.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc SC9863A आणि Android 11 (Go edition) वर चालतो.  

या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 3GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मेमरी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. Nokia C30 मधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. तसेच हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.   

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान