शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

नोकियाच्या चाहत्यांसाठी खुशखबर! फक्त 5,999 रुपयांमध्ये Nokia C01 Plus भारतात सादर 

By सिद्धेश जाधव | Updated: September 14, 2021 11:39 IST

Nokia C01 Plus Price In India: कंपनीने आपल्या या लो बजेट स्मार्टफोन Nokia C01 Plus साठी जियोसोबत हातमिळवणी केली आहे. Nokia C01 Plus स्मार्टफोन भारतात 5,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकंपनीने आपल्या या लो बजेट स्मार्टफोन Nokia C01 Plus साठी जियोसोबत हातमिळवणी केली आहे. Nokia C01 Plus स्मार्टफोन भारतात 5,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे.पावर बॅकअपसाठी नोकिया सी01 प्लसमध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Nokia ने भारतात आपला नवीन स्वस्त स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीच्या ‘सी’ सीरिजमध्ये Nokia C01 Plus हा फोन सादर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइडच्या हलक्या व्हर्जनवर चालतो. यात अँड्रॉइड 11 गो एडिशन देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या या लो बजेट स्मार्टफोन Nokia C01 Plus साठी जियोसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे Jio Exclusive offer अंतगर्त हा फोन फक्त 5,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल त्याचबरोबर 4,000 रुपयांचे एक्स्ट्रा बेनिफिट देखील मिळतील.  

Nokia C01 Plus ची किंमत आणि ऑफर  

Nokia C01 Plus स्मार्टफोन भारतात 5,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. परंतु Jio Exclusive offer अंतर्गत Nokia C01 Plus स्मार्टफोनवर जियो युजर्सना 10 टक्के प्राईस सपोर्ट दिला जात आहे. म्हणजे जियो युजर्सना या फोनच्या किंमतीवर 5,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जियो आपल्या ग्राहकांना 249 रुपयांचा रिचार्ज केल्यावर 4,000 रुपयांचे अतिरिक्त फायदे देखील देत आहेत. यात Myntra, PharmEasy, Oyo आणि MakeMyTrip च्या डिस्काउंट कुपन व वाउचरचा समावेश असेल

Nokia C01 Plus चे स्पेसिफिकेशन्स 

नोकिया सी01 प्लस कंपनीने 18:9 अस्पेक्ट रेशियोसह सादर केला गेला आहे. हा फोन 720 X 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने Nokia C01 Plus अँड्रॉइड 11 ओएससह लाँच केला आहे, फोनमध्ये Android 11 Go Edition देण्यात आले आहे.   

या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी Unisoc SC9863A चिपसेट देण्यात आला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन 2 जीबी रॅमसह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हि स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते. हा ड्युअल सिम फोन बेसिक कनेक्टिविटी ऑप्शन्ससह बाजारात आला आहे.  

Nokia C01 Plus च्या बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील 5 मेगापिक्सलचाच फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. 3.5एमएम जॅक सोबत सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया सी01 प्लसमध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड