शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

नोकिया ८ सिरोक्को : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Updated: February 27, 2018 16:03 IST

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ८ सिरोक्को हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ८ सिरोक्को हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने बार्सिलोना शहरात सुरू झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपल्या विविध मॉडेल्सचे अनावरण केले. यात नोकिया ७ प्लस, नोकिया १, नोकिया ६ (२०१८) आणि ८११० फोर-जी यांच्यासोबत नोकिया ८ सिरोक्कोचाही समावेश आहे. या सर्व स्मार्टफोन्समध्ये हेच मॉडेल सर्वात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज आहे. हा स्मार्टफोन आधीच उपलब्ध असणार्‍या नोकिया ८ या मॉडेलची पुढील आवृत्ती आहे. यातील बहुतांश फिचर्स हे अन्य फ्लॅगशीप मॉडेल्सप्रमाणेच आहेत. यात मेटलची बॉडी प्रदान करण्यात आली आहे. याच्या जोडीला हा स्मार्टफोन आयपी६७ मानकावर तयार करण्यात आला आहे. अर्थात हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असून तो कोणत्याही प्रकारच्या विषम वातावरणात वापरणे शक्य आहे.

नोकिया ८ सिरोक्को या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा, पीओएलईडी या प्रकारचा आणि क्युएचडी म्हणजे २५६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा वक्राकार डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. क्वॉलकॉमचा  ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८३५ हा अत्यंत गतीमान असा प्रोसेसर यात असेल. याची रॅम ६ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके आहे. तथापि, मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट नसल्यामुळे हे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा यात दिलेली नाही. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १२ आणि १३ मेगापिक्सल्सच्या झेईस लेन्सयुक्त कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. याला ड्युअल टोन एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८४ अंशाच्या विस्तृत व्ह्यू अँगलयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. या मॉडेलमध्ये बोथी मोड देण्यात आला असून याच्या मदतीने फ्रँट व बॅक कॅमेर्‍यांचा एकचदा उपयोग करणे शक्य आहे. यात वायरलेस चार्जींगच्या सपोर्टने युक्त असणारी ३२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा असेल.

नोकिया ८ सिरोक्को या स्मार्टफोनचे जागतिक बाजारपेठेतील मूल्य ७९९ युरो (सुमारे ५८ हजार रूपये) इतके आहे. एप्रिल महिन्यात हे मॉडेल ग्राहकांना प्रत्यक्षात मिळेल. तर भारतात हे मॉडेल मे महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Nokiaनोकिया