शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

नोकिया ७ प्लस : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Updated: April 5, 2018 18:45 IST

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोनदेखील भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. नोकिया ६ (२०१८) आणि नोकिया ८ सिरोक्को या मॉडेल्ससोबत नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोनदेखील भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. नोकिया ६ (२०१८) आणि नोकिया ८ सिरोक्को या मॉडेल्ससोबत नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही नोकिया ७ या मॉडेलची नवीन आवृत्ती असणार आहे. यात मूळ मॉडेल्सपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.अतिशय मजबूत अशी मेटलची बॉडी देण्यात आलेली आहे. यामध्ये ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.नोकिया ७ प्लसच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात झेईस कंपनीचे १२ आणि १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे लेन्स असतील. यातील एक टेलिफोटो लेन्स आहे. यात पोर्ट्रेट मोडची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.० अपार्चरयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. या कॅमेर्‍यांमध्ये नोकियाची खासियत असणारा बोथी मोड देण्यात आला आहे. याच्या मदतीने फ्रंट व बॅक कॅमेर्‍यांचा एकदचा उपयोग करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात प्रो कॅमेरा हे फिचर दिलेले असून याच्या मदतीने युजरला अ‍ॅडव्हान्स सेटिंगवर परिपूर्ण पद्धतीने नियंत्रणाची सुविधा मिळणार आहे.यासोबत इमेजिंग सूट दिलेला असून याच्या मदतीने प्रतिमांवर अतिशय आकर्षक असे फिल्टर्स लावण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात ३८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारा आहे. नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोन २५,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला असून अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून याची २० एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. याच दिवसापासून हा स्मार्टफोन देशभरातील नोकियाच्या शॉपीजमधूनही ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

टॅग्स :NokiaनोकियाMobileमोबाइल