शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Snapdragon 870 प्रोसेसर, कमी किंमत; Motorola Edge S २६ जानेवारीला होणार लाँच

By जयदीप दाभोळकर | Updated: January 20, 2021 16:02 IST

जाणून घ्या काय असतील स्पेसिफिकेशन्स

ठळक मुद्दे२६ जानेवारी रोजी फोन लाँच होणारQualcomm 870 या प्रोसेसरमध्ये 5G सपोर्ट देण्यात आला असून मिडरेंज फोनसाठी हा प्रोसेसर तयार केला आहे.

Snapdragon 870 प्रोसेसर, कमी किंमत; Motorola Edge S २६ जानेवारीला होणार लाँचMotorola Edge S will launch on January 26: मोटोरोलानं आपला अपकमिंग फोन Motorola Edge S हा २६ जानेवारी रोजी लाँच करण्याची तयारी केली आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 870 या चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. या प्रोसेसरचा सर्वाधिक क्लॉक स्पीड 3.2GHz इतका आहे. कंपनीनं आपल्या या मोबाईच्या लाँचची माहिती चिनी मायक्रोब्लॉगिंग साईट वीबोवरून केली आहे. Qualcomm ने गेल्या वर्षी आपल्या स्नॅपड्रॅगन 865 हा प्रोसेसर लाँच केला होता. Qualcomm Snapdragon 870 हा त्याच प्रोसेसरचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. या प्रोसेसरह कंपनीनं 5G सपोर्टही दिला आहे. युझर्सना उत्तम अनुभव मिळावा यासाठी क्वालकॉमनं 870 हा मिडरेंजसाठीचा प्रोसेसर लाँच केला आहे. दरम्यान, मोटोरोलाचा Motorola Edge S हा फोन 5G सपोर्टसह लाँच होणार का नाही याबाबत मात्र अद्याप कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही. असे असू शकतात स्पेसिफिकेशन्सMotorola Edge S चे काही स्पेसिफिकेशन्स यापूर्वीच लिक झाले आहेत. तसंच यामध्ये कोणता कॅमेरा वापरण्यात आला आहे याची माहिती देखील समोर आली होती. या लिकनुसार या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात येणार आहे. याचा रिफ्रेश रेटही 105 हर्ट्झ असू शकतो. या डिस्प्लेचं रिझॉल्युशन 2520*1080 पिक्सेल इतकं आहे. एका अन्य लिकनुसार हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. यापैकी एक 8 जीबी + 128 जीबी तर दुसरा व्हेरिअंटमध्ये 12 जीबी + २५६ जीबी स्टोरेजसह लाँच होऊ शकते. तसंच यामध्ये 5000 MAh ची बॅटरी देण्यात आली आहे. परंतु याला फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे अथवा नाही याबाबत माहिती समोर आली नाही. कसा असू शकतो कॅमेरा ?कॅमेऱ्याबाबत सांगायचं झालं तर स्मार्टफोमध्ये मागील बाजून ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलं जाणार आहे. तसंच याचा प्रायमरी कॅमेरा हा 64 मेगापिक्सेलचा असू शकतो. यासोबतच 16 मेगापिक्सेसची अल्ट्रा व्हाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी यात ड्युएल फ्रन्ट कॅमेरा सेटअप दिलं गेलं आहे. यातील एक कॅमेरा 16 मेगापिक्सेल तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असणार आहे. 26 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता लाँचिंग सेरेमनी पार पडणार आहे. या मोबाईल किंमत किती असेल याचा उलगडा कंपनी त्याच वेळी करणार आहे. 

टॅग्स :Motorolaमोटोरोलाtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलchinaचीन