शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

108MP कॅमेरा असलेला स्वस्त मोटोरोला स्मार्टफोन भारतात लाँच; इथून विकत घेता येणार Motorola Edge 20 Fusion 

By सिद्धेश जाधव | Updated: August 17, 2021 15:06 IST

Motorola Edge 20 Fusion: मोटोरोला एज 20 फ्युजन या सीरिजमधील स्वस्त स्मार्टफोन आहे जो 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8GB रॅमला सपोर्ट करतो.

ठळक मुद्देमोटोरोला एज 20 फ्युजन या सीरिजमधील स्वस्त स्मार्टफोन आहे जो 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8GB रॅमला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा Dimensity 800 चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 20 फ्युजन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

गेल्या महिन्यात जागतिक बाजारात सादर करण्यात आलेली Edge 20 सीरिज आज भारतात सादर करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Motorola ने Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion असे 5G स्मार्टफोन्स सादर केले आहेत. यातील एज 20 स्मार्टफोन भारतातील सर्वात हलका आणि स्लिम 5G स्मार्टफोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर मोटोरोला एज 20 फ्युजन या सीरिजमधील स्वस्त स्मार्टफोन आहे जो 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 8GB रॅमला सपोर्ट करतो. या लेखात आपण मोटोरोला एज 20 फ्युजनबाबत जाणून घेणार आहोत तर मोटोरोला एज 20 च्या माहितीसाठी इथे क्लिक करा.  

Motorola Edge 20 Fusion चे स्पेसिफिकेशन्स    

Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा 90Hz रिफ्रेश रेट असलेला अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 20:9 मॅक्स विजन अस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित माय यूएक्सवर चालतो, जो Android 13 पर्यंत अपडेट केला जाईल. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा Dimensity 800 चिपसेट दिला आहे. या मोटोरोला फोनमध्ये 8GB पर्यांतच रॅम आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.    

हे देखील वाचा: 18GB रॅम, 6,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसरसह दमदार ASUS ROG Phone 5S लाँच

फोटोग्राफीसाठी मोटोरोला एज 20 फ्युजन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमध्ये 108 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा मोटोरोला फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Motorola Edge 20 Fusion मधील 5,000एमएएचची मोठी बॅटरी 30वॉट टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.     

हे देखील वाचा: जबरदस्त! या स्मार्टफोनवर टिकणार नाही बॅक्टेरिया; अँटी-बॅक्टेरियल कोटिंगसह Ulefone Armor 12 Dual 5G लाँच

Motorola Edge 20 Fusion ची किंमत 

Motorola Edge 20 Fusion चे दोन व्हेरिएंट्स भारतात उपलब्ध होणार आहेत. फोनचा छोटा व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंट 21,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Motorola Edge 20 Fusion चे हे दोन्ही व्हेरिएंट 27 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्ट