शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अँड्रॉइड गो प्रणालीवर चालणारा मोटो ई ५ प्ले स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: July 16, 2018 16:40 IST

मोटोरोला कंपनीने आता अँड्रॉइड गो या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा मोटो ई ५ प्ले हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोला कंपनीने एप्रिल महिन्यात मोटो ई ५, मोटो ई ५ प्लस आणि मोटो ई ५ प्ले हे तीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. यातील मोटो ई ५ आणि मोटो ई ५ प्लस हे दोन मॉडेल्स अलीकडेच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. यातील मोटो ई ५ प्ले या किफायतशीर स्मार्टफोनला आता अँड्रॉइड गो या प्रणालीसह बाजारपेठेत उतारण्याची घोषणा आता करण्यात आली आहे.

गुगलने अँड्रॉइड ओरियो (गो एडिशन) ही प्रणाली खास करून अत्यंत किफायतशीर मूल्यात अँड्रॉइडच्या अद्ययावत आवृत्तीचा वापर करण्यासाठी विकसित केली आहे. भारतीय बाजारपेठेत मायक्रोमॅक्स, इंटेक्ससह अनेक कंपन्यांनी यावर चालणारे मॉडेल्स सादर केले आहेत. अलीकडेच समोर आलेल्या लीक्सचा विचार केला असता, सॅमसंगदेखील यावर चालणारा स्मार्टफोन लवकरच लाँच करण्याची शक्यता असल्याचे अधोरेखीत झाले आहे. या अनुषंगाने आता मोटोरोलानेही अँड्रॉइड गो प्रणालीची कास धरल्याचे स्पष्ट झाले आहे. मोटो ई ५ प्ले स्मार्टफोनचे नवीन मॉडेल हे याच आवृत्तीवर चालणारे असेल. यात खास या प्रणालीसाठी विकसित करण्यात आलेले अ‍ॅप्स देण्यात आलेले आहेत. पहिल्या टप्प्यात हा स्मार्टफोन दक्षीण अमेरिकेसह युरोपात उपलब्ध करण्यात येणार आहे. तथापि, भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हलच्या मॉडेल्सची लोकप्रियता पाहता लवकरच आपल्याकडेही याला लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे. याचे मूल्य १०९ युरो अर्थात अंदाजे ८,७०० रूपये इतके आहे. तथापि, भारतीय बाजारपेठेत यापेक्षा कमी मूल्यात सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

नवीन मोटो ई ५ प्ले या स्मार्टफोनमध्ये ५.३ इंच आकारमानाचा आणि मॅक्स व्हिजन या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ५.३ इंच आकारमानाचा (मूळ आवृत्तीपेक्षा एक इंच मोठा) आणि एचडी (१०८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा असणार आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४२५ व ४२७ प्रोसेसरचे पर्याय देण्यात आले आहेत. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. यातील ८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा हा एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकस या फिचर्सने सज्ज असणार आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असणार आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहेत. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान