शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

मायक्रोमॅक्सचा यू युरेका २ : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Updated: September 18, 2017 16:26 IST

मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्‍या यू टेलिव्हेंचर कंपनीने भारतात यू युरेका २ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे. 

ठळक मुद्देयू युरेका २ या मॉडेलमधील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेलयात ऑटो-फोकस, ड्युअल एलईडी फ्लॅश, जिओ टॅगींग, टच फोकस, फेस डिटेक्शन, एचडीआर, पॅनोरामा आदी फिचर्स असतीलयातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल

मायक्रोमॅक्सची उपकंपनी असणार्‍या यू टेलिव्हेंचर कंपनीने भारतात यू युरेका २ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे. यू युरेका २ या मॉडेलला मिड रेंज फ्लॅगशीप म्हणून गणले जात आहे. अर्थात यात किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. यू युरेका २ या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी ग्लासयुक्त वक्राकार डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ५२५ प्रोसेसर असेल. यू युरेका २ मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.

यू युरेका २ या मॉडेलमधील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यात ऑटो-फोकस, ड्युअल एलईडी फ्लॅश, जिओ टॅगींग, टच फोकस, फेस डिटेक्शन, एचडीआर, पॅनोरामा आदी फिचर्स असतील. तर यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यात ३० फ्रेम्स प्रति-सेकंद या गतीने १०८० पिक्सल्स क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे.

यू युरेका २ या मॉडेलमध्ये ३९६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असेल. यू युरेका २ या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान