शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मेझ मोबाईलचे भारतात पदार्पण

By शेखर पाटील | Updated: April 4, 2018 18:28 IST

मेझ मोबाईल या कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत मेझ अल्फा हा आपला पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात चीनमध्ये मेझ मोबाईल ही कंपनी सुरू झाली.

मेझ मोबाईल या कंपनीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत मेझ अल्फा हा आपला पहिला स्मार्टफोन सादर केला आहे. गेल्या वर्षाच्या उत्तरार्धात चीनमध्ये मेझ मोबाईल ही कंपनी सुरू झाली. या कंपनीने आता भारतीय बाजारपेठेत पदार्पण केले असून, आपला मेझ अल्फा हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला आहे. आजवर बहुतांश चिनी कंपन्यांनी किफायतशीर दरात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारे स्मार्टफोन्स सादर करून भारतीय बाजारपेठेवर कब्जा मिळवल्याचे दिसून येत आहे.या पार्श्‍वभूमीवर, मेझ कंपनीनेही हाच पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. अर्थात मेझ अल्फा या मॉडेलमध्ये मध्यम किंमतपट्ट्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. यात कडा विरहीत म्हणजेच बेझललेस या प्रकारातील ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा, फुल व्ह्यू आयपीएस, एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. यावर २.५ डी ग्लास आणि कॉर्निंग गोरीला ग्लास ४ चे आवरण दिलेले आहे. या स्मार्टफोनला झिंक अलॉय मेटलचे आवरण दिलेले आहे.मेझ अल्फा मॉडेलमध्ये ऑक्टा-कोअर मीडियाटेक हेलिओ पी २५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून, ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. यामुळे यातून सजीव प्रतिमा घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.तर यातील फ्रंट कॅमेरा हा १३ मेगापिक्सल्सचा असून यात ८४ अंशाचा वाईड अँगल असणारा कॅमेरा दिलेला आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. हे मॉडेल मिडनाईट ब्लॅक या रंगात फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहे. याचे मूळ मूल्य १५,९०० असले तरी ग्राहकांना १४,३१० रुपयात हा स्मार्टफोन सध्या मिळत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल