शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: स्पर्धात्मक खेळांमध्ये एआयचे फायदे अन् मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:34 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: प्रश्न असा आहे की एआयचा स्पर्धात्मक खेळांमध्ये फायदा होतो की मर्यादा येतात?

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: खेळ हे फक्त मनोरंजन नाही, ते रणनीती, निर्णय आणि मानसिक क्षमता वाढवण्याचे साधन आहे. आजच्या काळात एआय खेळांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावतोय. प्रश्न असा आहे की एआयचा स्पर्धात्मक खेळांमध्ये फायदा होतो की मर्यादा येतात?

पूर्वी खेळाडू फक्त बुद्धी, अनुभव आणि सरावावर अवलंबून होता. 'बुद्धिबळ, व्हिडिओ गेम किंवा क्रिकेट यासारख्या खेळांमध्ये यशाची गुरुकिल्ली रणनीती आणि निर्णयक्षमता होती. एआयने ही परिस्थिती बदलली आहे. आज अनेक खेळाडू एआयचा वापर साधन म्हणून करतात. यात रणनीती, विश्लेषण, प्रतिस्पर्ध्याची शैली आणि चुकांपासून शिकणे यासाठी फायदा होतो.

एआयचा मुख्य फायदा हा जलद निर्णय आणि डेटा-आधारित विश्लेषण. शतरंजमध्ये एआय विरोधकाच्या हालचालींचा अंदाज बांधतो, खेळाडूला नवीन रणनीती सुचवतो. व्हिडिओ गेम्समध्ये एआय गेम प्लेचे नमुने तयार करतो, चुका ओळखतो आणि सरावासाठी मार्गदर्शन करतो. या साधनांमुळे खेळाडू जलद सुधारतो आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढते. परंतु एआय वापराच्या मर्यादा देखील आहेत. जो खेळाडू एआयवर अवलंबून राहतो, तो स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता कमी करतो. आवश्यक परिस्थितीत एआय नसल्यास तो तळमळतो. यामुळे खेळाडूची स्वतंत्र रणनीती तयार करण्याची सवय कमी होते आणि अवलंबित्व वाढते.

सुधारित सरावासाठी एआय महत्त्वाचा आहे, परंतु निर्णय घेण्याची आणि धोका पत्करण्याची जबाबदारी माणसावरच राहते. एका उदाहरणार्थ : फुटबॉल प्रशिक्षक एआय प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचे विश्लेषणासाठी वापरतो. पण मैदानावर निर्णय घेताना, कोणता पास किंवा स्ट्रॅटेजी वापरायची हे प्रशिक्षकाच्या निरीक्षणावर आणि अनुभवावर अवलंबून असते. एआय मार्गदर्शन करतो, पण अंतिम निर्णय व्यक्तीचाच असतो.

एआय खेळाडूंच्या मानसिक तयारीसाठी देखील उपयोगी आहे. तो विश्लेषण गती वाढवतो, सत्र अधिक परिणामकारक करतो आणि खेळाडूच्या क्षमतेचा डेटा देतो. परंतु खेळातील भावना, स्पर्धेचा उत्साह आणि तत्काळ निर्णय क्षमता एआयकडे नसतो. फक्त मशीनवर अवलंबून राहिल्यास, खेळाडू ही अनुभवाची खोली हरवतो. 

याचाच अर्थ असा आहे की, एआय आणि खेळाडू यांची सहकार्यात्मक जोडणी आवश्यक आहे. एआय खेळाडूला अधिक सक्षम करतो, नवीन दृष्टिकोन देतो, परंतु माणसाचा निर्णय, अनुभव आणि प्रतिस्पध्र्थ्यांशी सामंजस्य राखण्याची क्षमता ही अजूनही अपरिवर्तनीय आहे. म्हणूनच आजच्या काळात खेळाडूची खरी क्षमता ठरते. एआय साधन म्हणून वापरण्याची कला, स्वतःचा अनुभव, निर्णय घेण्याची स्वतंत्र क्षमता. एआय केवळ गती आणि विश्लेषण वाढवतो; माणूस खेळाला अर्थ, भावना आणि सर्जनशीलता देतो.

Moral Story

Pavan was a young chess player who began using Al tools to study openings and analyze opponents. At first, he relied entirely on Al suggestions and won many games. However, when a tournament used a different format, Al guidance was limited. Pavan struggled because he had stopped trusting his own judgment. Realizing this, he began practicing by combining Al analysis with his independent thinking and strategy. Over time, his games improved, showing creativity and adaptability. Pavan learned that Al can guide and enhance skills, but true mastery comes from combining tools with personal experience and judgment.

एआयचा फायदा

जलद विश्लेषण आणि रणनीती सुचवणे.सरावाच्या वेळेत गती आणि अचूकता वाढवणे.प्रतिस्पर्ध्याच्या शैलीचा डेटा उपलब्ध करणे.चुका ओळखून सुधारणा सुचवणे.

एआयच्या मर्यादा

अवलंबित्व वाढू शकते.अचानक परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे.भावना, स्पर्धा आणि तात्काळ निर्णय क्षमता एआयकडे नाही.स्वतंत्र रणनीती विकसित करण्याची सवय कमी होऊ शकते.

- अजिंक्य देशमुख 

English
हिंदी सारांश
Web Title : AI in Sports: Benefits and Limitations in Competitive Games

Web Summary : AI enhances sports strategy and analysis, but over-reliance can hinder independent decision-making. Combining AI insights with human experience is crucial for success. AI offers data, but players bring emotion and creativity.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान