शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लॉगीटेकचे हिंदी किबोर्ड दाखल

By शेखर पाटील | Updated: April 11, 2018 17:52 IST

लॉगीटेक कंपनीने खास भारतीय युजर्ससाठी दोन हिंदी किबोर्ड बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून यातील एक वायरयुक्त तर दुसरा वायरलेस या प्रकारातील आहे.

भारतात संगणक आणि इंटरनेटचा वापर प्रचंड गतीने वाढला आहे. मात्र या तुलनेत भारतीय भाषांमध्ये अजून तंत्रज्ञान वापराचा वेग हा तुलनेत कमी आहे. अलीकडच्या काळात अनेक टेक कंपन्यांनी याला जाणीवपूर्वक गती देयाचे प्रयत्न केले आहेत. आता भारतीय भाषांचा सपोर्ट असणारी सॉफ्टवेअर्स आणि विविध उपकरणे सादर केली जात आहेत. या अनुषंगाने संगणकीय उपकरणांसाठी ख्यात असणार्‍या लॉगीटेक कंपनीने के१२० आणि एमके२३५ हे दोन किबोर्ड सादर करण्याची घोषणा केली आहे. हे दोन्ही हिंदी किबोर्ड असून पहिले मॉडेल हे वायरयुक्त तर दुसरे वायरलेस या प्रकारातील आहे. भारतीय नागरिकांना डिजीटल तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी लॉगीटेक कंपनीने .....ही मोहीम सुरू केली आहे. याच्या अंतर्गत हे दोन्ही किबोर्ड लाँच करण्यात आले असून या माध्यमातून देशातील ४० कोटी हिंदी भाषिकांना त्यांच्याच भाषेत टाईप करण्याची सुविधा देण्यात येत असल्याचे लॉगीटेक कंपनीने नमूद केले आहे. या माध्यमातून देशातील डिजीटल दरी सांधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. लॉगीटेक के१२० हा किबोर्ड संगणक वा लॅपटॉपला युएसबी पोर्टच्या माध्यमातून कनेक्ट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तर एमके२३५ हे मॉडेल ब्ल्यु-टुथच्या मदतीने कनेक्ट करता येणार आहे. याची रेंज १० मीटरची असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हे दोन्ही किबोर्ड विंडोज ७, विंडोज ८ आणि विंडोज १० तसेच क्रोम ओएस या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणार्‍या संगणकीय उपकरणांसोबत वापरता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यामध्ये हिंदीसह इंग्रजीत टाईप करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.

लॉगीटेक के१२० हे मॉडेल ६९५ रूपयात मिळणार असून यासोबत तीन वर्षांची वॉरंटी प्रदान करण्यात आली आहे. तर लॉगीटेक एमके२३५ या वायरलेस किबोर्डसोबत माऊसदेखील देण्यात आला असून या दोघांचे एकत्रीत मूल्य १,९९५ रूपये इतके असून याला एक वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. हे दोन्ही किबोर्ड अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून १५ एप्रिलपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान