शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

एलजी व्ही ३० मॉडेलची घोषणा; अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश

By शेखर पाटील | Updated: August 31, 2017 15:20 IST

एलजी कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित एलजी व्ही ३० या मॉडेलचे अनावरण केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

ठळक मुद्देएलजी व्ही ३० या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहेयाच्या मुख्य कॅमेर्‍यात अनेक उत्तम दर्जाचे फिचर्स देण्यात आले आहेत. यात सिने व्हिडीओ हे लक्षणीय आहे.याच्या मदतीने कुणीही अगदी चित्रपटासमान व्यावसायिक चलचित्रकाराच्या सफाईने शुटींग करू शकतो

एलजी कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित एलजी व्ही ३० या मॉडेलचे अनावरण केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

आयएफए-२०१७फच्या प्रारंभी एलजी कंपनीने गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागून असणारे एलजी व्ही-३० हे मॉडेल जगासमोर सादर केले आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये ६ इंच आकारमानाचा १८:९ हे गुणोत्तर असणारा ओएलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हा डिस्प्ले क्युएचडी म्हणजेच १४४० बाय २८८० पिक्सल्स क्षमतेचा असेल. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने तब्बल दोन टेराबाईटपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.

एलजी व्ही ३० या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याच्या मागील बाजूस एफ/१.६ अपार्चरसह १६ मेगापिक्सल्सचा टेलिफोटो लेन्सयुक्त तर एफ/१.९ अपार्चरसह१३ मेगापिक्सल्सचा वाईंड अँगल लेन्सने सज्ज असणारा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. याच्या मुख्य कॅमेर्‍यात अनेक उत्तम दर्जाचे फिचर्स देण्यात आले आहेत. यात सिने व्हिडीओ हे लक्षणीय आहे. याच्या मदतीने कुणीही अगदी चित्रपटासमान व्यावसायिक चलचित्रकाराच्या सफाईने शुटींग करू शकतो. यात १६ विविध फिल्टर्स देण्यात आले असून यामुळे कुणीही प्रोफेशनल कलर ग्रेडींग प्रदान करू शकतो. या माध्यमातून स्मार्टफोनवरील व्हिडीओ चित्रीकरणाला एक नवीन आयाम प्रदान करण्यात आला आहे. याच्या जोडीला पॉइंट झूम हे अभिनव फिचर असेल. नावातच नमूद असल्यानुसार याच्या मदतीने व्हिडीओ चित्रीकरण करतांना स्क्रीनवरील कोणत्याही बिंदूपर्यंत झूम करता येणार आहे. याच्या मुख्य कॅमेर्‍यात क्रिस्टल क्लिअर या प्रकारातील लेन्स असेल. आजवर स्मार्टफोच्या कॅमेर्‍यांमध्ये प्लॅस्टीकची लेन्स वापरली जात असते. मात्र एलजी व्ही ३० या स्मार्टफोनमध्ये प्रथमच काचेची लेन्स असून याच्या मदतीने चांगल्या प्रकाशमान प्रतिमा काढता येतील.

एलजी व्ही ३० या मॉडेलमध्ये वायरलेस चार्जींगसह ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. तसेच हे मॉडेल वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंटही आहे. यात उत्तम दर्जाच्या श्रवणानुभुतीसाठी हाय-फाय क्वॉड डीएसी हे फिचर देण्यात आले आहे. तसेच यात दोन अतिशय उत्तम असे डिजीटल मायक्रोफोनही असतील. यामुळे व्हिडीओ रेकॉर्डींग करतांना उत्कृष्ट ध्वनीमुद्रण करता येणार आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला एलजी व्ही २० हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या एन या आवृत्तीवर चालणारा होता. यामुळे एलजी व्ही ३० मॉडेल हे अलीकडेच सादर करण्यात आलेल्या ओरिओ म्हणजेच ओ या आवृत्तीवर चालणारा असेल असे मानले जात होते. तथापि, हे मॉडेल आधीच्याच म्हणजे एन प्रणालीवर चालणारा आहे. यात लवकरच अँड्रॉइड ओ अपडेट मिळणार असल्याचा दिलासा मात्र एलजी कंपनीने दिला आहे.  हा स्मार्टफोन पहिल्यांदा दक्षिण कोरियात २१ सप्टेंबरपासून ग्राहकांना मिळणार आहे. यानंतर लागलीच भारतासह अन्य राष्ट्रांमध्ये हे मॉडेल मिळू शकेल असे मानले जात आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल