शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लेफोन डब्ल्यू 15 : जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Updated: October 17, 2017 11:49 IST

लेफोन कंपनीने २२ भारतीय भाषा तसेच फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा लेफोन डब्ल्यू १५ हा स्मार्टफोन ५,४९९ रूपये मुल्यात भारतीय ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

लेफोन या चीनी कंपनीने भारतात या वर्षी एप्रिल महिन्यात पदार्पण केले आहे. या कंपनीने आधी डब्ल्यू २ आणि डब्ल्यू ७ हे दोन मॉडेल्स लाँच केले आहेत. आता याच मालिकेतील डब्ल्यू १५ हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. अर्थात आधीप्रमाणेच हादेखील एंट्री लेव्हल या प्रकारातील स्मार्टफोन असेल.  यात पाच इंची एचडी ( १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा ) २.५ डी वक्राकार डिस्प्ले असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविता येईल. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा तर सेल्फीसाठी २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. यात २००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील.

लेफोन डब्ल्यू १५ या मॉडेलमध्ये २२ भारतीय भाषांचा सपोर्ट असेल. अर्थात ग्राहकांना आपापल्या भाषेत याचा युजर इंटरफेस वापरता येणार आहे. यात मराठीसह हिंदी, आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, नेपाळी, ओरिया, मणिपुरी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. अर्थात हे हा स्मार्टफोनचे वैशिष्ट्य ठरू शकते. लेफोन डब्ल्यू १५ हा स्मार्टफोन रेड, गोल्ड, सिल्व्हर आणि रोझ गोल्ड या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले असून हे मॉडेल ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान