शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

लेनोव्हो टॅब 7 : जाणून घ्या सर्व फीचर्स

By शेखर पाटील | Updated: November 16, 2017 13:36 IST

लेनोव्हो कंपनीने आपला लेनोव्हो टॅब ७ हा टॅबलेट भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

अलीकडच्या कालखंडात टॅबलेटच्या विक्रीत सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी बाजारात नवनवीन टॅबलेट दाखल होत आहेत. यात आता लेनोव्हो टॅब ७ ची भर पडली आहे. हा टॅबलेट ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ९,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येईल. यात ६.९८ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस या प्रकारातील डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वाड-कोअर मीडीयाटेक एमटी८७३५बी हा प्रोसेसर दिलेला असेल. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

लेनोव्हो टॅब ७ या मॉडेलमध्ये ऑटो-फोकससह ५ मेगापिक्सल्सचा मुख्य तर २ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यातील फ्रंट स्पीकर हे डॉल्बी अ‍ॅटमॉस तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. यामुळे यात अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभुती घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातील बॅटरी ३,५०० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा टॅबलेट अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. यात लेनोव्हो फ्रेमवर्क, लेनोव्हो अकाऊंट, गुगल कॅलेंडर, गुगल शीटस् आदी अ‍ॅप प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. तसेच यात मल्टी युजर-मल्टी स्पेस हे विशेष फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या माहितीचा अ‍ॅक्सेस सुरक्षित ठेवत हा टॅबलेट इतरांना वापरण्यासाठी देऊ शकतात.

यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क कनेक्टिव्हिटी असून यावरून व्हाईस कॉलींगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय यात थ्री-जी व २-जीचा सपोर्टदेखील असेल. तसेच यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, युएसबी, युएसबी-ओटीजी आदी फिचर्स असतील.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानtabletटॅबलेट