शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कुलपॅड मेगा ४ ए स्मार्टफोनची घोषणा

By शेखर पाटील | Updated: April 10, 2018 22:28 IST

कुलपॅड कंपनीने कुलपॅड मेगा ४ ए हा स्मार्टफोन बाजारपेठेत ५,९९९ रूपये मूल्यात ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

कुलपॅड कंपनीने गेल्या वर्षी सादर केलेल्या कुल प्ले ६ या स्मार्टफोनसोबतच कुलपॅड मेगा ४ ए या मॉडेलची घोषणा करण्यात आली होती. तथापि, याच्या लॉचींगला विलंब झाला होता. या पार्श्‍वभूमीवर, आता हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून आहे. यात हा स्मार्टफोन फक्त ऑफलाईन पध्दतीत अर्थात देशभरातील शॉपीजमधून मिळणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

कुलपॅड मेगा ४ ए या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजे १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम नेमकी किती असेल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. तथापि, यात १६ जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असणार आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणार आहे. यात फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणार आहे. मात्र यातील कॅमेरे आणि अन्य फिचर्सची माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही.

कुलपॅड कंपनीने भारतीय बाजारपेठेत गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून कोणतेही मॉडेल लाँच केलेले नाहीत. यातच अन्य कंपन्यांनी किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारे मॉडेल्स लाँच करण्याचा सपाटा लावला असतांना या कंपनीने दीर्घ काळाचा विराम घेतला. या पार्श्‍वभूमिवर, कुलपॅड मेगा ४ ए या मॉडेलला चांगला प्रतिसाद मिळण्याची कंपनीला आशा आहे. तथापि, आता एंट्री लेव्हलच्या सेगमेंटमधील स्मर्धा अजून तीव्र झालेली असल्यामुळे हे वाटते तितके सोपे नव्हेच!

टॅग्स :technologyतंत्रज्ञान